महाराष्ट्रदिन निमित्त सालवडगाव येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्रक्रिया शिबिर सम्पन्न

शेवगाव दि.२ मे (प्रतिनिधी) :
रोटरी क्लब ऑफ शेवंगाव सिटी, श्री शनैश्वर देवस्थान खरडगाव , विठ्ठल रुख्मिनी देवस्थान सालवडगाव, बुधराणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा सालवडगाव ता शेवंगाव येथे शिबीर सम्पन्न झाले.
शिबिरामध्ये 85 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यामधील 20 रुग्णांची नेत्र शस्रक्रिया बुधराणी हॉस्पिटल पुणे येथे करण्यात येणार आहे.
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ शेवंगाव सिटी चे अध्यक्ष बाळासाहेब चौधरी, सोसायटीचे चेअरमन आदिनाथ लांडे, बुधराणी हॉस्पिटलच्या डॉ माया आल्हाट, मेजर देविदास बोडखे यांनी शिबिरार्थीना मार्गदर्शन केले.
यावेळी सरपंच आण्णासाहेब रुईकर, सोसायटीचे व्हा. चेअरमन काशिनाथ रुईकर, बुधराणीचे डॉ अमित पिल्ले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल भापकर, रोटरी चे माजी अध्यक्ष भागनाथ काटे, आदिनाथ टेकाळे, विजय म्हस्के व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी मेजर देविदास बोडखे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ काकासाहेब लांडे यांनी केले. सरपंच आण्णासाहेब रुईकर यांनी आभार मानले.