ब्रेकिंग
सैनिकनगर परिसरातील डेअरी फार्म येथे मोकाट डुकरांचा सुळसुळाट!

भिंगार दि.२५ मे (प्रतिनिधी)
भिंगार शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या शहापुर -केकती ग्रामपंचायत हद्दीतील सैनिकनगर परिसरातील डेअरी फार्म येथे मागील काही दिवसांपासून मोकाट डुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
कचरा, तसेच सांडपाण्याच्या डबक्यांमध्ये मोकाट डुकरे बसून असतात.
त्यातच डुक्कर मृत होत असल्याने परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे.
या डुकरांपासून बालकांना धोका आहे. त्यामुळे मोकाट डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे .