बेलवंडी पोलिसांकडून चोरीच्या दोन मोटरसायकल जप्त

अहमदनगर दि.27सप्टेंबर (प्रतिनिधी )
दिनांक 12/ 8 /2023 रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास शाहरुख मोहम्मद सय्यद राहणार बांदल मळा घारगाव तालुका श्रीगोंदा यांची काळे रंगाची प्लेटिना मोटरसायकल क्रमांक एम एच 16 डी डी 8361 हिचे वरुन शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता सदर मोटार सायकल बांधालगत उभी केली होती. शेतात पाणी भरण्यासाठी गेले काही वेळानंतर मोटरसायकल लावलेल्या जागी आले.मोटरसायकल त्या ठिकाणी दिसून आली नाही म्हणून तिचा आजूबाजूस परिसरात शोध घेतला परंतु मोटरसायकल मिळून आली नाही म्हणून यांची खात्री झाली की मोटरसायकल चोरून नेली आहेत यावरून बेलवंडी पोस्ट नंबर 342/2023 भादवी 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार आजिनाथ खेडकर हे करत असताना घारगाव शिवारातील आरोपींनीच मोटरसायकलची चोरी केली असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली की, आरोपी शुभम गोविंद वैरागळ रा. घारगाव तालुका श्रीगोंदा व अनिल उर्फ सोन्या मोतीराम आल्हाट राहणार पारगाव तालुका श्रीगोंदा यांनी केल्याची माहिती मिळाली. यावरून यातील आरोपी हे श्रीगोंदा पोस्टेकडील गुन्हयात अटक आहेत.त्याप्रमाणे मा.विद्यमान कोर्टाकडून सदर आरोपींस वर्ग करुन घेवुन पोलीस कस्टडी दरम्यान यातील आरोपींनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.सदर गुन्ह्यातील मोटरसायकल प्लेटिना मोटरसायकल,हिरो कंपनीची होंडा फॅशन मोटर सायकल अशा एकुण 50,000/- रुपये किंमतीच्या दोन मोटार सायकली तपासा दरम्यान काढून दिल्या आहेत .
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विवेकानंद वाखारे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे बेलवंडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक पोसई गाजरे पोहेकॉ/खेडकर,पोना/शेख,पोकॉ/रामदास भांडवलकर,पोकॉ/चालक , भाऊ शिंदे ,विकास सोनवणे यांनी केली. पुढील तपास पोलीस हवालदार खेडकर करत आहे.