स्टेट बँक चौक येथे विनापरवाना बेकायदा विदेशी दारू विकणाऱ्यास भिंगार पोलिसांनी केले गजाआड!

अहमदनगर दि. १५ जुलै (प्रतिनिधी) भिंगार पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विनापरवाना बेकायदा विदेशी दारू विकणाऱ्यास भिंगार पोलिसांनी गजाआड केले असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. याबाबतची आधिक माहिती अशी की,
दि.14 जुलै रोजी कॅम्प पोस्टे भिंगारचे प्रभारी अधिकारी सपोनी श्री/दिनकर मुंडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि,स्टेट बँक चौक येथे एक इसम हा विनापरवाना बेकायदा विदेशी दारूची वाहतूक करीत आहे. अशी बातमी मिळाल्याने सोनू शरद शिंदे (वय 27 वर्षे रा.भोसले आखाडा बुरुडगाव रोड अहमदनगर) यास ताब्यात घेण्यात आले. असून त्याने गुन्हा कबूल केला आहे.त्याचे ताब्यात एक होंडा अँवेटर कंपनीची मोपेड नं.एम एच.16 सी जे 1686 अशी 60,000/- रू.किं.ची विदेशी दारू 14,785/- असा एकूण 74,785 /- किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या बाबत कॅम्प पोस्टे गुरनं/ 439/2023 मप्रोकाक 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकाडे,यांचे मार्गदर्शना खाली भिंगार कॅम्प पो.स्टे.चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे,पोहेकाँ/रेवननाथ दहीफळे,पोहेकाँ/संदिप घोडके,पोना/दिपक शिंदे,पोना/राहुल द्वारके,पोकाँ/अमोल आव्हाड यांनी कारवाई केली आहे.