जनविकास सेवाभावी संस्था जामखेड यांच्या वतीने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भेट व सत्कार!

जामखेड दि. २८ जुलै (प्रतिनिधी)
मुंबई येथील महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेचे उपाध्यक्ष मा. ना. नरहरी झिरवाळ यांची भेट झाली असता जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील एका आदिवासी पारधी समाजातील महिलेने स्वतः पुढाकार घेऊन सामाजिक कामाची चळवळ सुरू केली. त्याबद्दल विशेष कौतुक केले. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड, कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातील आदिवासी समाजाच्या समस्या जाणून घेतल्या. व येथील आदिवासी समाजाचे होणारे स्थलांतर, मुलांचे शिक्षण, महिलांच्या समस्या, रूढी परंपरा व समाजात असलेली अंधश्रद्धा यासंदर्भात विविध विषयावर सविस्तर चर्चा केली. व सदर समस्या सोडविण्यासाठी जनविकास सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कशा पद्धतीने प्रयत्न केले जातील .यासंदर्भात सविस्तर माहिती घेतली. तसेच संस्थेच्या माध्यमातून नुकतेच ५०० जातीच्या दाखल्यांचे वाटप केल्याबद्दल अभिनंदन केले. व संस्थेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मीताई पवार, उपेंद्र आढाव सर, संतोष गर्जे सर, मिरा तंटक, सोनाली समुद्र आदी उपस्थित होते.