अहमदनगर जिल्ह्यातील हिंदू राष्ट्रसेना संघटनेच्या बॅनर वरून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो तात्काळ हटविण्याचे आदेश

अहमदनगर (प्रतिनिधी):- दि २८ ऑगस्ट २०२२ रोजी मा.मुख्यमंत्री यांच्याकडे श्री.योगेश साठे यांनी महाराष्ट्र राज्यातील हिंदू राष्ट्रसेनेच्या बॅनर वरील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हटविण्यात यावा यासाठी तक्रार दाखल केली होती.त्या अनुषंगाने अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार श्री.दिवाण जिल्हादंडाधिकारी अहमदनगर यांनी दि १४ सप्टेंबर २०२२ रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, मा.पोलिस अधीक्षक, आणि मा.आयुक्त अहमदनगर महानगरपालिका अहमदनगर यांना नियमोचित कार्यवाहीत बॅनर व फोटो हटविण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कोणा एका समाजाची मक्तेदारी नसून ते युनिव्हर्सल आयडियल आहेत,त्यांनी संविधानातून इथल्या प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य दिले आहेत त्याच बरोबर जगाला हेवा वाटेल अशी आदर्श लोकशाही दिली आहे.परंतु हिंदू राष्ट्र सेना सारख्या अविचारी संघटनेचे पदाधिकारी हे भारतीय संविधानाचे शिल्पकार,भारतरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त बहुजनांसाठी त्यांचे आयुष्य त्यांच्या विचार,भाषण आणि लेखनाच्या माध्यमातून संघर्षमय जीवन समाजातील प्रत्येक वंचित शोषित पीडित घटकांसाठी खर्ची केले आहे,हे आपण जाणता परंतु, हिंदू राष्ट्रसेना या संघटनेच्या अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी लागलेले बॅनर वर संविधान शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावून त्यांनी संविधांनद्वारे स्थापित केलेल्या समता,स्वातंत्र्य,बंधुता आणि न्याय या मूलभूत तत्त्वांची विटंबना करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केलेला आहे.त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात नव्हे तर भारत देशात सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाचे सर्वोत्तम संविधान लिहून त्यात धर्मनिरपेक्ष हे मूलभूत तत्व समाविष्ट केलेले असून सर्वांना संविधानिक नीतिमत्तेचे पालन करण्यास सांगितले आहे,दरम्यान हिंदुराष्ट्र सेना संघटनेचे हेतू हे जरी हिंदू राष्ट्र स्थापित करणे असा असेल तरी त्यांच्या संघटनेच्या उद्देशात आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात कुठल्याही प्रकारचा ताळमेळ बसत नाही. यामुळे हिंदुराष्ट्र सेना ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्यांच्या बॅनर वर लावत त्यांच्या विचारांची एक प्रकारे अवहेलना करून विटंबनाच करीत असल्याचे दिसून येत आहे.सदर तक्रारमध्ये एकप्रकारे लोकशाही मार्गाने निषेध च नोंदविण्यात येत आहे असे समजून आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सदरील प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सेनेच्या बॅनर वरून भारतरत्न.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो तात्काळ हटविण्याचे आदेश देऊन कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.