धार्मिक

न्यु इंग्लिश स्कुल पाडळी विद्यालयाच्या वतीने मोठ्या उत्साहात दिंडी सोहळा!

पाथर्डी दि.९ जुलै (प्रतिनिधी)

पाथर्डी तालुक्यातील पाडळी गावातील न्यू इंग्लिश स्कुलच्या वतीने पाई दिंडीचे आयोजन करण्यात आले त्यात मोठ्या उत्साहाने शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय आकर्षक पारंपारिक वेशभुषा केली होती. हातात टाळ, पताका, झेंडे घेउन विद्यालय ते विठ्ठल-रूक्मिणी मंदिरापर्यंत पाई दिडी मिरवण्यात आली यामध्ये, विठ्ठल-रुक्मिणी,वारकरी अशा पोशाखामध्ये सर्व विदयार्थी आलेल होते या दिंडी सोहळ्यासाठी संस्थेचे सचिव श्री कुशलजी भापसे साहेब हे आपल्या कुटुंबासह उपस्थित होते. व मोठ्या उत्साह दाखवत स्वत: रिंगणात फुगडी खेळले तसेच या सोहळ्यात गावातील ह.भ.प बबन महाराज भिसे, ह.भ.प दिपक महाराज कचरे, व विदयालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व ग्रामस्थ बहुसखने या दिंडी सोहळ्यासाठी उपस्थित होते. यामध्ये अनेक ग्रामस्थांनी व महिलांनी फुगडी खेळत सगळ्यांची मने जिंकली. यावेळेस संस्थेचे सचिव श्री कुशलजी भापसे म्हणाले की “हा कार्यक्रम छान झाला आणि यापुढेही दरवर्षी हा सोहळा आपण चालु ठेवु आणि यात आणखीण नवनवीन उपक्रम घेउ” असे आश्वासन दिले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे