नव्याने दुरुस्त केलेल्या नगर जामखेड रस्त्यावर नगर तालुका हद्दीत निंबोडी ते चिचोंडी पाटील आठवड गावापर्यंत क्रोसिंग पट्टे व गतिरोधक बसवा: जनाधार सामाजिक संघटनेची मागणी
लवकरात लवकर काम पूर्ण करा नाही तर राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला टाळे ठोकू: प्रकाश पोटे

अहमदनगर दि.२५ (प्रतिनिधी) : जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय राष्ट्रीय महामार्ग कार्यालय अहमदनगर येथे निवेदन दिले.
नगर तालुक्यातील निंबोडी ते चिचोंडी पाटील-आठवड,गावा न च्या परिसरामध्ये,मागील एक महिन्यात कमीत कमी दहा मोठे अपघात झालेले आहेत.यात पोलिस प्रशासनाच्या नोंदीनुसार वेगळ्या अपघातांमध्ये पाच ते सहा निष्पाप व्यक्तींनी केवळ प्रशासनाच्या चुकीमुळे प्राण गमावले आहेत. जनाधार सामाजिक संघटनेने वारंवार निवेदन देऊनही कुठलीही दखल घेतली जात नाही.येत्या १ एप्रिल पर्यंत जर नगर जामखेड रोडवर क्रोसिंग पट्टे व गतिरोधक बसवले नाही,तर संघटनेच्या वतीने टाळे ठोकण्यात येईल. व राष्ट्रीय महामार्ग कार्यालय बंद करण्यात येईल, अशी मागणी उपविभागीय अभियंता डी. एन. तारडे यांना निवेदनाद्वारे मागणी केली. यावेळी जनाधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, दीपक गुगळे, अमित गांधी, संदीप तेलघूने, गौतमी भिंगारदिवे, विजय मिसाळ, रेखा डोळस, सुभाष कोळपे, दत्तात्रय कराळे, रोहिणी पवार, आदी उपस्थित होते,