सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीत छत्रपति शिवराय कुस्ती स्पर्धांचे शानदार उद्घाटन, स्पर्धेच्या माध्यमातून नगरची मान राज्य पातळीवर उंचावणार!

अहमदनगर दि. २७ मे (प्रतिनिधी): छत्रपती शिवराय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीमध्ये व स्वागताध्यक्ष किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी नाथ भक्त बजरंग महाराज शेळके, मौलाना जमीर खान, ह. भ. प. अमृतमहाराज शिंदे, मुस्ताक अहमद, बौद्ध धर्माचे, मिलिंद बोथी मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, शीख धर्माचे मनमोहनसिंग खालसा, ख्रिश्चन धर्माचे रेव्हरेंड मनीष गायकवाड, मौलाना शहबाज खान नदवी, रेव्हरेंड जे. आर. वाघमारे आदी उपस्थित होते. जैन धर्माचे अलोक ऋषीजी महाराज यांनी देखील यावेळी शुभेच्छा दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराज व रामभक्त बजरंग बलीच्या मुर्तीला स्वागताध्यक्ष किरण काळे आणि मान्यवरांच्या हस्ते हार घालत उद्घाटन समारंभाला सुरुवात झाली. यावेळी महिलांच्या कुस्तीने स्पर्धेचा शुभारंभ झाला. यावेळी धार्मिक सलोखा, एकोपा जपण्याचा संदेश किरण काळे युथ फाउंडेशनच्या वतीने या स्पर्धेच्या निमित्ताने नगर वासियांना देण्यात आला. सर्व धर्मगुरूंनी या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काळे यांचे कौतुक करत या स्पर्धेच्या माध्यमातून नगरकरांची मान राज्य पातळीवर उंचावेल असा आशीर्वाद यावेळी दिला. उपस्थित सर्व मल्लांना देखील शुभेच्छा दिल्या.
किरण काळे म्हणाले की, अहमदनगर चे नाव क्रीडा विश्र्वामध्ये यानिमित्ताने मोठे करण्याची संधी या निमित्ताने मिळाली यासाठी मी स्वतःहाला भाग्यवान समजतो. आज एवढ्या मोठ्या स्पर्धेच्या उद्घाटनाचा समारंभ हा सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीत मध्ये पार पडतो आहे आणि सर्वधर्मीय धर्मगुरू आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत. ही या स्पर्धेसाठी फार अभिमानाची आणि ऊर्जा देणारी बाब आहे.
मजनू चित्रपटाची टीमची यावेळी विषेश उपस्थित होती. लागीर झालं प्रेम आज्या उर्फ नीतीश चव्हाण, अभिनेत्री श्वेतालता अहिरे, दिग्दर्शक शिवानी दोलताडे, निर्माते गोवर्धन दोलताडे, बर्थडे आहे भावाचा फेम रोहन पाटील, दिग्दर्शक रामकुमार शेंडगे यांनी कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावली यावेळी आज्याच्या भोवती नगरकरांनी सेल्फीसाठी गर्दी केली होती.
मनोज गुंदेचा यांनी प्रास्ताविक करताना किरण युथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित स्पर्धे मागील भूमिका या वेळी मांडली. यावेळी कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, माजी विरोधी पक्ष नेते दशरथ शिंदे, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा अध्यक्ष प्रवीण गीते, तालीम संघाचे पै.वैभव लांडगे, पै. नामदेव लंगोटे, अक्षय कुलट, पै. वैभव लांडगे, पै. नामदेव धनवटे, पै. नाना डोंगरे, संयोजन सल्लागार समितीचे अध्यक्ष पैलवान सुभाष लोंढे, सल्लागार कमिटीचे सहप्रमुख हर्षवर्धन कोतकर, नगरसेवक पैलवान संग्राम शेळके, सागर गायकवाड, नगरसेवक आसिफ सुलतान आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
***** शहरात कुस्तीमय वातावरण :
किरण काळे यांच्या पुढाकारातून पार पडत पडत असलेल्या या स्पर्धेमुळे संपूर्ण नगर शहरात कुस्तीमय वातावरण झाले आहे. नगरकरांना उद्यापासून रंगणाऱ्या सामन्याची उत्सुकता लागली आहे. नगर शहरासह जिल्ह्याच्या विविध तालुके व गावांमधून या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी गर्दी करणार आहेत.
****** शुक्रवार दि. २७ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून पहिल्या सत्राला सुरुवात होणार असून दुसरे सत्र सायंकाळी ४.३० वाजता सुरू होणार आहे. किरण काळे फाउंडेशनच्या वतीने कुस्तीप्रेमींनी यावेळी पार पडणाऱ्या कुस्त्यांचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.