स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई कोपरगाव तातुका पोलीस स्टेशन हद्दीत पकडली ४२ लाख २० हजाराची अवैध वाळु चोरी

अहमदनगर दि. ३ जुलै (प्रतिनिधी) कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ४२ लाख २० हजाराची अवैध वाळु चोरी पकडली आहे. या कारवाईची आधिक माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधीक्षक
मा. श्री. राकेश ओला साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोना/गणेश भिंगारदे, पोकॉ/रणजीत जाधव, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे व किशोर शिरसाठ अशा पोलीस अंमलदारांचे पथक नेमून अवैध वाळु चोरी व वाहतुकी विरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकाने कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन हद्यीत कारवाई करुन अवैधरित्या वाळु चोरी व वाहतुक करणा-या ठिकाणी छापा टाकुन एकुण 42,20,000/- (बेचाळीस लाख, विस हजार) रुपये किंमतीचा सात विविध कंपनीचे ट्रॅक्टर व दोन ब्रास वाळु असा मुद्देमाल जप्त करुन खालील प्रमाणे आरोपीं विरुध्द कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन येथे भादविक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. कलम आरोपीचे नाव व पत्ता जप्त मुद्देमाल
1. कोपरगांव तालुका गु.र.नं. 333/2023 भादविक 379, 34 सह भाप.का.क. 3, 15 1) करण बाळासाहेब बर्डे वय 20, रा. शहाजापुर, ता. कोपरगांव
2) दत्तु कोळपे रा. कोळपेवाडी, ता. कोपरगांव (फरार)
3) दिलीप विलास पवार वय 25, रा. कोळगांवथडी, ता. कोपरगांव
4) देवराम वाल्मीक कोळपे रा. कोळपेवाडी, ता. कोपरगांव (फरार)
5) किरण साहेबराव निकाळे वय 25, रा. कोळगांवथडी, ता. कोपरगांव
6) रामा कुंदलके, रा. कोळपेवाडी, ता. कोपरगांव (फरार)
7) कृष्णा दिपक मोरे वय 20, रा. सुरेगांव, ता. कोपरगांव
8) आकाश मदने, रा. कोळपेवाडी, ता. कोपरगांव (फरार) ताब्यतील आरोपीचे कब्जातुन 42,20,000/- रुपये किंमतीचे विविध कंपनीचे सात ट्रॅक्टर व दोन ब्रास वाळु जप्त
9) अनिल नाथु कचारे वय 28, रा. कोळपेवाडी, ता. कोपरगांव
10) मिलींद खर्डे रा. माहेगांव, ता. कोपागरंव (फरार)
11) अक्षय किशोर मोरे वय 19, रा. कुंभारी ता. कोपरगांव
12) गणेश डांगे रा. माहेगांव, ता. कोपरगांव (फरार)
13) योगेश संजय कोळपे रा. कोळपेवाडी, ता. कोपरगांव (फरार)
एकुण 13 आरोपी ताब्यतील आरोपीचे कब्जातुन 42,20,000/- रुपये किंमतीचे विविध कंपनीचे सात ट्रॅक्टर व दोन ब्रास वाळु जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, मा. श्री. संदीप मिटके साहेब, उविपोअ, शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.