तोफखाना पोलीस स्टेशन मधील ‘त्या’ अधिकाऱ्याची तात्काळ बदली करावी अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचा इशारा

अहमदनगर दि.९ जुलै (प्रतिनिधी):-तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यास अभय देणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंकी यांच्यावर आठ दिवसात कारवाई करून त्यांची तात्काळ बदली करावी,अन्यथा पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आरपीआय (आठवले) गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना समक्ष भेटून निवेदनाद्वारे दिला आहे.
या संदर्भात पोलिस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात सुनील साळवे यांनी म्हटले आहे की,तोफखाना पोलिस स्टेशन हद्दीत, महिलांच्या गळ्यातील गंठण व दागिणे चोऱ्या करणारी टोळी,बिंगो जुगार,आयपीएल जुगारासह मावा, गुटखा या सारख्या अनेक दोन नंबर व्यवसाय सुरू आहे.तसेच जागा ताबा मारणेच्या सर्व तक्रारी उपनिरीक्षक समाधान सोळंकी यांचेकडेच तपासासाठी असतात.त्यात जागा मालक यांना धमकावून गुन्हेगार लोकांना जागेचा ताबा देऊन खरेदी करण्यास भाग पाडले जाते.तोफखाना हद्दीत लोकांचे संक्षरण करण्याची जबाबदारी असतांना गरीब लोकांवर खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन सोळंकी यांनी आपली दहशत निर्माण केली आहे.संबंधित अधिकारी यांचा प्रशिणार्थी कालखंड संपून देखील साडेतीन वर्षे झाले असून त्यांची अद्याप बदली झालेली नाही.गोरगरीब महिला तक्रार देण्यास गेल्या असता त्यांना दमबाजी करणे,शिवीगाळ करणे,हाकलून देणे अशा अनेक तक्रारी त्यांच्या विरोधात आहेत.तरी या अधिकाऱ्याची सखोल चौकशी करून त्यांच्या पासून जनतेला होणारा त्रास थांबविण्यात यावा, त्यांच्यावर ८ दिवसात योग्य ती कारवाई करण्यात यावी व तात्काळ बदली करावी.कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यास रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल,असा इशारा सुनील साळवे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.