नागरिकाला जगण्याच्या न्याय हक्कासाठी कायदा अस्तित्वात आला आहे: गोकुळ दौंड

नागरिकाला जगण्याच्या न्याय हक्कासाठी कायदा अस्तित्वात आला आहे: गोकुळ दौंड
पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख
तालुक्यातील पाडळी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील शांतीनगर येते ॲट्रॉसिटी कायदा संबंधी जनजागृती अभियान कार्यक्रमांतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण,अरविंद सोनटक्के, ॲड,विष्णुदास भोरडे, पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे,बाजीराव गर्जे, दिलीप कचरे,सरपंच सौ. सुरेखा बाजीराव गर्जे,उपसरपंच सौ.सुमन दिलीप कचरे,संजय कांबळे,सुहास कांबळे,बाळासाहेब गर्जे,अशोक कांबळे,हरिदास कांबळे,जितेश कांबळे,बबन ढगे,नंदू कांबळे ग्रामसेविका पी.व्ही.गायके गायके मॅडम,आशा सेविका अनिता कांबळे ,वनिता गर्जे व समस्त ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 या कायद्याची जनजागृती कार्यशाळा घेण्याची घेणारी तालुक्यातील पाथर्डी गावची ग्रामपंचायत पहिली ठरली आहे यावेळी प्रा. किसन चव्हाण म्हणाले की देशात पूर्वीपासून भेदभाव होता अशा गोष्टीतून संत महापुरुष सुटले नाहीत देशाला स्वातंत्र्य मिळून लोकशाही आली संविधान स्वीकारून कायद्याचे राज्य आले देशात न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी काम केले वेगवेगळ्या पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ॲट्रॉसिटी सारख्या कायद्याचा दुरुपयोग केल्याने हा कायदा बदनाम झाला आहे असे चव्हाण सर म्हणाले यावेळी गोकुळ दौंड म्हणाले खरा अन्याय अत्याचार झाला असेल तर न डगमगता कायद्याचा वापर आपण नक्कीच करावा अनुसूचित जाती-जमातीतील लोकांना मुख्य प्रवाहात आणून सरकारच्या अनेक असंख्य ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध योजनेची माहिती मिळवून आपला विकास साधता येईल असे आवाहन गोकुळ दौंड यांनी केले यासाठी पाडळी चे सरपंच व उपसरपंच नेहमीच विकास कामासाठी सदैव संपर्कात असतात कार्यक्रमाचे प्रास्तविक बाजीराव गर्जे यांनी केले,सूत्रसंचालन संजय कांबळे केले व आभार सुहास कांबळे यांनी मानले.