गुन्हेगारी

एमआयडीसी हददीत मालकाची १,८९,०००/- रकमेची चोरी करणा-या आरोपीस अटक एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी

अहमदनगर दि. ३१ जुलै (प्रतिनिधी)
दिनांक ३०/०७/२०२३ रोजी फिर्यादी रौफ शमसुददीन सय्यद वय ३२ वर्ष रा. बोल्हेगाव ता.जि. अहमदनगर यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, छत्रपती संभाजीनगर येथून कंपनीचा माल भरण्याकरीता फिर्यादी यांचे मालकीचा ४०७ टेम्पोवरील चालक महेश रामदास कोरडे यास १,८९,००० /- रू रोख रक्कम दिली असता ती त्याने स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता चोरुन नेली आहे. वैगेरे मचकुराचे फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा रजि नंबर ६९३ / २०२३ भादवि कलम ३८१ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हा वडगाव गुप्ता शिवार येथे असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस पथक सदर आरोपीस पकडण्याकरीता पाठविले. त्यावरून एमआयडीसी पोलीसांनी त्यास पकडुन त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव महेश रामदास कोरडे वय २८ वर्ष हिवरे कोरडा ता.जि. अहमदनगर असे सांगीतले सदर आरोपीस मा. कोर्टासमक्ष हजर केले असता मा. कोर्टाने त्यास दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केला आहे. अटक आरोपीकडुन सदर गुन्हयातील चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करत आहोत.
सदरची कारवाई मा.श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब अपर पोलीस अधीक्षक सो. अहमदनगर, श्री.संपराव भोसले साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी सो. नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोना नेहुल, पोना गणेश पालवे, पोना भागवत, पोकों किशोर जाधव, पोकों/ शुभम सुद्रीक पोकों गजानन गायकवाड, पोकों/ नवनाथ दहिफळे, पोकों गवारे यांचे पथकाने केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे