कर्जत तालुका ग्रामरोजगार सेवकांतर्फे एक दिवस काम बंद आंदोलन

कर्जत (प्रतिनिधी)
कर्जत तालुका ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्या संदर्भात काम बंद आंदोलन करण्यात आले. ग्रामरोजगारांच्या मागण्या -1. ग्रामरोजगार यांना कायमस्वरूपी शासन सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावे. 2. ग्रामरोजगार सेवक यांना मानधन ऐवजी मासिक वेतन सुरू करण्यात यावे. 3. ग्रामरोजगार सेवक यांना पूर्वीप्रमाणे प्रवास भत्ता पुन्हा सुरू करण्यात यावा. 4. ग्रामरोजगार सेवकांची इतर ग्रामपंचायत कर्मचारी प्रमाणे सेवा पुस्तिका भरण्यात यावी. 5. ग्रामरोजगार सेवक यांना ग्रामपंचायत पातळीवर बदलण्यात येऊ नये. 6. ग्रामरोजगार सेवक यांची अर्धवेळ सेवा बंद करून त्यांना पूर्ण वेळ करण्यात यावे. 7. ग्रामरोजगार सेवक यांना विमा संरक्षण लागू करण्यात यावे. इत्यादी मागण्यासाठी ग्रामरोजगार सेवकांकडून आज एक दिवशी कामकाज बंद आंदोलन करण्यात आले. व गटविकास अधिकारी आणि तहसीलदार साहेब कर्जत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रामरोजगार सेवक संघटना जिल्हाध्यक्ष मा. अनिल गंगावणे आणि कर्जत तालुका अध्यक्ष युवराज नवसरे आणि कर्जत तालुका ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.