मुलानेच घेतला बापाचा बळी!

शिर्डी (प्रतिनिधी) मुलानेच घेतला बापाचा बळी घेतल्याची कोपरगाव तालुक्यात घडली आहे.या बाबतची सविस्तर माहिती अशी की,
दारू पिऊन मुलाला शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या बापाचा मुलाने लाकडी दांड्याने मारहाण करून खून केला. कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे ही घटना घडली.सखाहरी चंदू थोरात (वय ८०) असे मयताचे नाव आहे.सखाहरी थोरात हे नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आले.त्यांनी त्याचा मुलगा सुरेश सखाहरी थोरात (वय ४८) याला शिवीगाळ करत दांड्याने मारहाण केली.याचा राग आल्याने मुलगा सुरेश थोरात याने वडील सखाहरी थोरात यांना लाकडी दांड्याने डोक्यात,हाता-पायावर बेदम मारहाण केली. त्यात वडील सखाहरी यांचा मत्यू झाला.मुलगा सुरेश याने तशी कबुली दिली आहे.सहायक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी मुलगा सुरेश सखाहरी थोरात याच्यावर भादंवि कलम ३०२ प्रमाणे शिर्डी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपी सुरेश थोरात याला पोलिसांनी अटक केली असून,पोलीस निरीक्षक पाटील हे पुढील तपास करीत आहेत.