वांबोरी परिसराला वादळी पावसाचा तडाखा, मंत्री तनपुरे यांनी भेट देत मदतीचे दिले आश्वासन

राहुरी दि.१५ जून ( प्रतिनिधी )-
वांबोरी परिसराला शनिवारी जोरदार वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा फटका बसला असून यामध्ये अनेक विजेचे खांब पडले तसेच एका गाईचा मृत्यू झाला व काही शेतकऱ्यांच्या घराचे पत्रे उडाले आहेत या सर्व नुकसानीची पाहणी करण्यासाठी ना. प्राजक्त तनपुरे वांबोरी येथे आले असता त्यांनी या सर्व नुकसानग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
शनिवारी दुपारी अचानक आलेल्या पावसाने वांबोरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले या नुकसानीची मंत्री तनपुरे यांनी पाहणी केली. या प्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, माजी सरपंच नितीन बाफना, डॉ तनपुरे कारखान्याचे संचालक भारत तारडे, ब्राह्मणीचे सरपंच डॉ राजेंद्र बानकर, विठ्ठल मोकाटे, तहसीलदार फसियोद्दीन शेख, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, महावितरणचे उपअभियंता धिरज गायकवाड, महावितरणचे अभियंता तान्हाजी भोर, गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे , बाबासाहेब तोडमल, तुषार मोरे, गोरक्षनाथ ढवळे, शंकरराव मोरे, संभाजी गडाख, दीपक गडाख, अशोक पटारे, बापुसाहेब गडाख, ईश्वर कुसमुडे, पोपट देवकर, कुलदिप पाटील, विलास शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यमंत्री तनपुरे यांनी यावेळी मान्सूनपूर्व पावसाने वांबोरी कुक्कडवेढे भागात झालेल्या जोरदार पावसाने मोठे नुकसान झाले असून त्या नुकसानग्रस्त नागरिकांना जास्तीत जास्त निधी मिळवून दिला जाईल. गेल्या अनेक वर्षांपासून नगर वांबोरी रस्त्याचे काम प्रलंबीत होते त्यासाठी 5 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला असून रस्त्याचे काम पूर्ण होत आले आहे अवघे एक किलोमीटरचे काम बाकी असताना त्याबाबतच्या अडचणी बाबत संबंधित अधिकारी वन खात्याचे अधिकारी यांची बैठक घेऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावला जाईल. असे सांगितले.
याप्रसंगी बोलताना बाबासाहेब भिटे म्हणाले की, वांबोरी परिसरावर मंत्री तनपुरे यांनी विकास कामांच्या माध्यमातून कायमच झुकते माप दिले असून परिसरामध्ये पाणी योजना, अनेक डांबरी रस्ते , विजेचे रोहित्रे त्याचबरोबर सौर ऊर्जा प्रकल्प नगर -वांबोरी रस्ता मजबुती अशी कामे मंत्री तनपुरे यांनी मार्गी लावली. गडाख वस्ती येथील नागरिकांनी स्मशान भूमीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करताच मंत्री तनपुरे यांनी मागणी मान्य केली.