कोठला भागात कत्तल खाण्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा! दोन लाख एकोणचाळीस हजार आठशे पन्नास हजार रु.किंमतीचे 1,100 (अकराशे) किलो गोमास, दोन जिवंत जनावरे ताब्यात

अहमदनगर (प्रतिनिधी) तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले कोठला भागात कत्तल खाण्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकत मोठी कारवाई केली असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.या कारवाईत गोमांस व दोन जिवंत जनावरे ताब्यात घेतली आहेत.या कारवाईची सविस्तर माहिती अशी की, जिल्हा पोलिस अधीक्षक
मा. श्री. राकेश ओला साहेब यांनी पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे, सफौ/मनोहर शेजवळ, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, संदीप पवार, संदीप घोडके, पोना/शंकर चौधरी, सचिन आडबल, संदीप चव्हाण, पोकॉ/जालिंदर माने, मपोकॉ/सारीका दरेकर, चापोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर व संभाजी कोतकर अशांना बोलावुन घेवुन अहमदनगर शहरात अवैध धंद्याविरुध्द कारवाई करणे बाबत सुचना देवुन मार्गदर्शन करत असताना पोनि/श्री. अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, कोठला येथील शहा स्टील फर्निचर शेजारील, हॉटेल कुरेशी पाठीमागे, पत्र्याच्या शेडमध्ये इसम नामे मोसीन कुरेशी हा गोवंशीय जातीची जिवंत जनावरे डांबुन ठेवुन, त्यांची कत्तल करुन गोमासची विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगुन आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीरमाहिती मिळाल्याने पोनि/श्री. कटके यांनी लागलीच स्थागुशा पथकास तात्काळ बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.
स्थागुशा पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी लागलीच दोन पंचाना सोबत घेवुन कोठला परिसर, अहमदनगर येथील शहा स्टील फर्निचर शेजारील, हॉटेल कुरेशी मागे, पत्र्याच्या शेड जवळ जावुन खात्री केली असता 04 (चार) इसम जनावराची कत्तल करुन मास तोडताना व आजु बाजुला रक्त सांडलेले दिसल्याने पथक छापा घालण्याचे तयारीत असतांना नमुद इसमांना पोलीस पथकाची चाहुल लागताच एक इसम पळुन जावु लागला पथकातील अंमलदारांनी त्यांचा पाठलाग केला परंतु तो मिळुन आला नाही. इतर अंमलदारांनी 03 (तीन) इसमांना शिताफीने ताब्यात घेवुन पोलीस पथकाची ओळख सांगुन ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) मोसीन बाबामियॉ कुरेशी, वय 41, रा. कोठला, अहमदनगर, 2) सलीम बाकर कुरेशी, वय 19, रा. बेपारी मोहल्ला, अहमदनगर, 3) राजीक अफरोज कुरेशी, वय 19, रा. बेपारी मोहल्ला, अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे गोवंश कत्तलखान्या बाबत विचारपुस करता सुरुवातीस त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांना अधिक विश्वासात घेवुन चौकशी करता त्यांनी सदर कत्तलखाना हा मोसीन बाबामियॉ कुरेशी हे चालवत असुन गोमांस विक्री करत असल्याची कबुली दिली. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे कब्जात 1100 किलो गोमास व अर्धवट कापलेली गोवंशीय जनावरे, एक गाय, एक लहान वासरु व कत्तलीसाठी लागणारी हत्यारे असा एकुण 2,39,850/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन सदर बाबत पोहेकॉ/ 440 संदीप कचरु पवार ने. स्थागुशा अहमदनगर यांचे फिर्यादी वरुन तोफखाना पोलीस स्टेशन 986/2022 भादविक 269, 34 सह महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम कल 5 (क), (ब), 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील कारवाई तोफखाना पोस्टे करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, अतिरीक्त कार्यभार अहमदनगर, श्री. अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.