गुन्हेगारी
तोफखाना पोलिसांनी पकडली 3 लाखांची सुगंधी तंबाखू व गुटखा!
बेकायदेशीर साठवणूक करणाऱ्यांना भरली धडकी !

अहमदनगर (प्रतिनिधी) तोफखाना पोलिसांनी अवैधरित्या साठवूण ठेवलेली 3 लाख 56 हजारांची सुगंधी तंबाखू व गुटखा पकडला आहे.
या कारवाईमुळे गुटखा व सुगंधी तंबाखूची बेकायदेशीर पणे साठवणूक करणाऱ्यांना चांगलीच धडकी भरली आहे.
प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व गुटखा असा एकूण ३ लाख २२ हजार ५६ रुपयांचा माल तोफखाना पोलिसांनी पकडला असून,
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलिस उप निरीक्षक समाधान सोळंके, मपोउनि शुभांगी मोरे, पोना इनामदार, पोना पठाण, पोना शैलेश गोमसाळे, पोकाॅ दिपक आव्हाड, पोकॉ केदार, पोकॉ गि-हे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.