राजकिय

निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय ऐतिहासिक -सौ. धनश्री विखे पाटील

राहुरी दि. 6 फेब्रुवारी (प्रतिनिधी)
उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकरीता निश्चितच ऐतिहासिक आणि आनंदाचा क्षण असल्याचे प्रतिपादन रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री सुजय विखे पाटील यांनी केले.
निळवंडे उजव्या कालव्यामुळे शेतकरी नक्कीच सुखावेल असा विश्वास व्यक्त करून राज्यातील महायुती सरकारमुळे धरणाच्या दोन्ही कालव्याच्या कामाला गती मिळून पाणी सोडण्याच्या निर्णय शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तर नगर जिल्ह्यासह राहुरी तालुक्यासाठी वरदान असणारे निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे तांभेरे,कानडगाव, निंभेरे, तुळापूर, तांदूळनेर,वडनेर,कनगर,चिंचविहरे ,गुहायेथे जलपूजन रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्रीताई विखे पाटील व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी राव कर्डीले यांच्या हस्ते करण्यात आले.
धनश्री विखे यांनी सांगितले की जिल्ह्याच्या विकासासाठी महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि खा.डॉ सुजय विखे पाटील सदैव प्रयत्नशील आहेत त्यांनी केलेल्या विकास कामामुळे जिल्ह्याचा विकास होत असल्याचे स्पष्ट करून,
निळवंडे कालवा व्हावा ना. विखे पाटील यांचा पाठपुरवा महत्वपूर्ण ठरला असल्याचे सौ.विखे म्हणाल्या.
यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सुरेश बानकर, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे,रवींद्र म्हसे, भिमराज हारदे, नानासाहेब गागरे,डॉ बापूसाहेब मुसमाडे, सरपंच निशा गागरे,उत्तम राव मुसमाडे,संदीप गीते,मारुती नालकर,सर्जेराव गाडगे, संदिप गाडगे ,आणा पाटील बलमे, बबनराव कोळसे,विजय बलमे, यांच्या सह सर्व व पदाधिकारी ,अधिकारी व ग्रामस्थ उपस्तीत होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे