राजकिय

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दूरस्थ प्रणालीद्वारे २५ फेब्रुवारी रोजी नवीन क्रिटिकल केअर रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन

अहमदनगर दि.24 ( प्रतिनिधी ) – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवार 25 फेब्रुवारी 2024 रोजी देशभरातील विविध आरोग्य संस्थांच्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांचे भुमिपुजन करुन राष्ट्राला समर्पण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दूरस्थ प्रणालीव्दारे राजकोट (गुजरात) येथे सायंकाळी 4.45 ते 5.45 वाजेपर्यंत आयोजीत केलेला आहे.
आपल्या महाराष्ट्र राज्यातील पाच जिल्हा रुग्णालयांच्या ठिकाणी रु 135.05 कोटी इतक्या रक्कमेच्या कामांचे भुमिपुजन तसेच राज्यातील 88.18 कोटी रु किंमतीच्या 10 कामांचे लोकापर्ण यावेळी करण्यात येणार आहे.
अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालय परीसरातील नवीन 50 खाटांच्या क्रिटीकल केअर हॉस्पीटल ब्लॉक या इमारती करीता रु 2375 लक्ष रक्कमेच्या कामाच्या भुमिपुजनचा समावेश आहे. या निमित्ताने आरोग्याच्या बाबतीत दर्जेदार सेवा सुविधा जन सामान्याकरीता निशुल्क व प्रभावी पध्दतीने उपलब्ध करुन देवुन विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प करण्यात येत आहे.
जिल्हा रुग्णालय, अहमदनगर येथे या दूरस्थ भूमिपुजनाच्या डिजिटल पदधतीने हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला असुन दुरदृश्य प्रणालीव्दारे कार्यक्रमस्थळी थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. जिल्ह्यातील, शहरातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे