गुन्हेगारी

शेवगांव येथील अवैध वाळु वाहतुकी विरुध्द कारवाई करुन 10,80,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखे कडून जप्त!

अहमदनगर दि. १२ एप्रिल (प्रतिनिधी)
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध वाळु उत्खनन/उपसा व वाहतुकी विरुध्द कारवाई करणे बाबतचे आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील पोना/सचिन आडबल, विशाल गवांदे, पोकॉ/शिवाजी ढाकणे, आकाश काळे व चापोहेकॉ/संभाजी कोतकर असे शेवगांव तालुक्यात अवैध वाळु उत्खनन व वाहतुकी विरुध्द कारवाई करणे करीता पेट्रोलिंग करत असतांना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, अशोक शिंगडे हा शेवगांव तालुक्यातील हातगांव ते मुंगी जाणारे रोडने, पांढ-या रंगाचे ढंपरमधुन अवैध वाळु वाहतुक करीत आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी सदर माहिती पथकास कळवुन पंचांना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबतचे सुचना दिल्या. नमुद सुचने प्रमाणे पथकाने पंचांसह हातगांव ते मुंगी, ता. शेवगांव रोडने जावुन सापळा लावुन थांबलेले असतांना एक पांढरे रंगाचा ढंपर येताना दिसला पथकाची खात्री होताच चालकास बॅटरीच्या सहाय्याने थांबण्याचा इशारा करता चालकाने वाहन थांबविले. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन वाहनाची पाहणी करता त्यामध्ये वाळु असल्याची खात्री झाल्याने सदर चालकास वाळु वाहतुकीचे परवान्या बाबत विचारपुस केली असता त्याने त्याचेकडे शासनाचा वाळु उत्खनन/उपसा किंवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसले बाबत सांगितले. त्यामुळे पथकाने त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) महेश बंडु खरात वय 25, व 2) अशोक आण्णासाहेब शिंगडे, वय 43, दोन्ही रा. मुंगी, ता. शेवगांव असे असल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींनी अवैधरित्या शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता किंवा रॉयल्टी न भरता शासकिय मालकिची वाळु अवैध उत्खनन व चोरी करुन पर्यावरणाचे नुकसान होईल असे कृत्य केल्याने आरोपींना 10,80,000/- (दहा लाख एैशी हजार) रु. किंमतीचा पांढरे रंगाचा ढंपर व चार ब्रास वाळुसह ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं. 319/2023 भादविक 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्री. संदीप मिटके साहेब, उविपोअ, श्रीरामपूर विभाग अति. प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे