आम्हीही महिलांच्या हक्कांसाठी काम करणार.. महिला काँग्रेसच्या माध्यमातून अनेकींचा राजकीय श्रीगणेशा नगर शहर जिल्हा महिला काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर, १८ जणींचा समावेश!

अहमदनगर (प्रतिनिधी) : महिलांचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्यांना ही सामाजिक, राजकीय व्यासपीठावरून मुक्तपणाने व्यक्त होता आले पाहिजे. आमचीही मतं विचारात घेतली पाहिजेत, असे म्हणत आम्हीही महिलांच्या हक्कांसाठी काम करणार असा निश्चय करून कधीही राजकारणात नसणाऱ्या शहरातील अनेक महिलांनी महिला काँग्रेसच्या माध्यमातून शहर विकासासाठी व महिलांच्या हक्कांसाठी राजकीय श्रीगणेशा केला आहे.*
शहर जिल्हा काँग्रेसने सांस्कृतिक विभागाच्या जम्बो कार्यकारणीनंतर आता महिला काँग्रेसची कार्यकारणी जाहीर केली आहे. तशी घोषणा शहर महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषाताई भगत यांनी केली आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महिलांच्या प्रश्नावर काम करणार असून ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या धोरणा प्रमाणे अंमलबजावणी करणार आहोत, असे भगत यांनी म्हटले आहे.
कार्यकारणीमध्ये शहराच्या सर्व भागांना स्थान देण्यात आले असून खुल्या प्रवर्गासह ओबीसी, व्हीजेएनटी, एससी, एसटी यांना देखील स्थान देत सर्व प्रवर्गांना प्रतिनिधित्व देवून समतोल साधण्यात आला आहे. स्वतःच्या पायावर उभे राहत व्यवसाय करणाऱ्या महिलांपासून नोकरी करणाऱ्या, गृहिणी असणाऱ्या महिलांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यातील अनेक महिला पदाधिकारी या पहिल्यांदाच राजकारणात सक्रियपणे काम करणार आहेत. लवकरच नवनियुक्त कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असल्याची माहिती भगत यांनी दिली आहे.
नवयुक्त कार्यकारीणीचे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, आ.डॉ.सुधीर तांबे, आ. लहू कानडे, संगमनेर नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी डॉ.जयश्रीताई थोरात, शरयूताई देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव सचिन गुंजाळ, प्रदेश प्रवक्त्या तथा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षाताई रुपवते आदींनी अभिनंदन केले आहे.
*कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :* शहर जिल्हाध्यक्ष – उषाताई अशोक भगत, वरिष्ठ उपाध्यक्ष – जरीना पठाण (माजी नगरसेविका), उपाध्यक्ष – राणी ललित पंडित, शारदा शाहूराव वाघमारे, प्रभावती प्रभाकर सत्रे, ज्योती उमेश साठे, पुनम अंबादास वन्नम, ललिता नरेंद्र मुदीगंटी, सरचिटणीस – कल्पना चांगदेव देशमुख, अर्चना प्रमोद पाटोळे, मोमीन मिनाज जाकीर हुसेन, निर्मला अरुण कोरडे, सचिव – इंदुमती सुभाष ढेपे, हेमलता विनोद घाडगे, मीना हनुमंतराव रणशूर, सहसचिव – अश्विनी उत्तम परळकर, अरुणा महादेव आंबेकर, शारदा अशोक कर्डिले, समन्वयक – विना शामसुंदर बंग.