वंचितचे जिल्हा प्रभारी डॉ.सुरेश शेळके यांच्या उपस्थितीत संयुक्त आढावा बैठक संपन्न!

अहमदनगर(प्रतिनिधी): जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत वंचित बहुजन समाजाला सत्तेत बसविण्यासाठी अकोला पॅटर्न राबविणार असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रभारी प्रा. शेळके यांनी केले.
अहमदनगर येथे दक्षिण व उत्तर जिल्हा कार्यकारणीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पुढे बोलताना प्रा.शेळके म्हणाले की देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाले. परंतु, वंचित बहुजन समाजाला सत्तेचा वाटा लोकसंख्येच्या प्रमाणात मिळाला नाही. केंद्रीय व राज्य सरकार हे मिळून ओबीसी भटके विमुक्त, मुस्लीम व वंचित मराठा समाजाला आरक्षण न देता फसवणूक करत आहे. जर खरच वंचित समूहाला सत्तेत यायचे असेल, तर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीत सर्व वंचित समूहानी सहभागी व्हावे. अकोला जिल्हयात ज्याप्रमाणे सर्व सत्ता स्थाने ही वंचित बहुजन समाजाच्या हातात आहेत. त्या प्रमाणेच नगर जिल्ह्यातसुद्धा परिवर्तन करू, असे त्यांनी बैठकीला संबोधित करताना म्हटले आहे.
या बैठकीला जिल्हा अध्यक्ष विशाल कोळगे, महासचिव योगेश साठे,अनिल जाधव,महिला जिल्हाध्यक्ष वर्षा बाचकर,बेबी निरभवणे,रोहिणी देठे,दादा समुद्र,संजय जगताप,प्रविण ओरे,जिल्हा उपाध्यक्ष संतोष गलांडे,मारुती पाटोळे,रवी जाधव,जीवन पारधे,प्रमोद आढाव,अमर निरभवणे आदीसह उत्तर दक्षिण चे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन जिल्हा सचिव चंद्रकांत नेटके यांनी केले आणि आभार युवा जिल्हाध्यक्ष संतोष जठार यांनी मानले.