राजकिय
शिर्डी लोकसभा मतदार संघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे विजयी

अहमदनगर दि. 4 जून (प्रतिनिधी )
शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात विजयी घोषित करण्यात आले आहेत. त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक ज्येष्ठ सनदी अधिकारी अजय कुमार बिष्ट हे उपस्थित होते.