“शासन आपल्या दारी” उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजाणी करा उद्दिष्टापेक्षा अधिक लाभार्थ्यांना दाखले वितरणाची कार्यवाही करा दाखले वाटपाचे काटेकोरपणे नियोजन करा- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

अहमदनगर, दि.30 मे (प्रतिनिधी):- शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी “शासन आपल्या दारी हा उपक्रम” राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या दाखल्यांसाठी त्यांना शासकीय कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही, यादृष्टीने दाखले वाटपाचे काटेकोर नियोजन करत या उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक लाभार्थ्यांना विविध दाखले वितरणाची कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
“शासन आपल्या दारी” या उपक्रमा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. सालीमठ बोलत होते.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सचिन पाटील, उपजिल्हाधिकारी श्रीमती वैशाली आव्हाड यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सालीमठ म्हणाले की, शासकीय योजनांची अंमलबजावाणी गतिमानतेने होण्याच्यादृष्टीने संपुर्ण राज्यभर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्याला दाखले वाटपाचा उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. अहमदनगर जिल्हा विस्ताराने अधिक मोठा असुन जिल्ह्यातील लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी मोठा वाव आहे.त्यामुळे सर्व विभाग प्रमुखांनी कल्पकपणे व समन्वयाने या उपक्रमाची अंमलबजावणी करत अधिकाधिक लाभार्थ्यांना दाखले वाटपाची कार्यवाही विहित वेळेत पुर्ण करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेकविध दाखल्यांची आवश्यकता भासते. या विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी शासकीय कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही, यादृष्टीने दाखले वितरणाचे काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमधुन शिबीराद्वारे लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात यावे. याबाबत एकाची ग्रामस्थाची तक्रार येणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. सालीमठ यांनी महसुल, आरोग्य, शिक्षण,कृषी, समाजकल्याण, महिला वबालकल्याण, पशुसंवर्धन, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, कौशल्य विकास,ऊर्जा, रेशीम विकास, विविध महामंडळे यासह इतर विभागांमार्फत उपक्रमाबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावाही त्यांनी यावेळी घेतला.