“या ” आमदारांनी तात्काळ शिक्षकांची माफी मागावी:वेणूनाथ कडू

गंगापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रशांत बंब यांनी दिनांक २९ नोव्हेंबर २०२३ रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राष्ट्रनिर्माणाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांबद्दल पुरेशा माहितीच्या अभावी त्यांच्या शिक्षकांप्रती असलेल्या वैयक्तिक भावनेतून नियमानुसार मिळणाऱ्या ४% वाढीव डी ए शिक्षकांना मिळू नये अशा आशयाचे पत्र मा. मुख्यमंत्री, मा. उप मुखमंत्री व मा. शिक्षण मंत्री यांना लेखी दिलेले आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शिक्षक व शिक्षक कुटुंबीयांच्या भावना दुखावल्या गेल्या असून अद्याप ही मिडीयावर शिक्षकांबद्दल अजूनही अपशब्द बोलत आहेत. मा. आमदार बंब यांनी अर्थहीन अपूर्ण माहितीच्या आधारे केलेल्या आरोपाचे व त्यांना प्रशासकीय नियमाची माहिती नसल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. याउलट आज शिक्षक करत असलेले काम व त्यांची विद्यार्थ्यांप्रती, समाजाप्रती असलेली तळमळीनची त्यांना जाणीव नाही.शासनाकडून वेळेवर अनुदान मिळत नाही, वेतनेतर अनुदान मिळत नाही त्यावेळेस वेळ प्रसंगी स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून शिक्षक शाळा चालवताना दिसतात.शाळेमध्ये देशाप्रती, राज्याप्रती देशप्रेम,राष्ट्रप्रेम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचे काम करतात. व विद्यार्थ्याना विविध स्वरुपात मार्गदर्शनात शिक्षण देवून देशाला,राज्याला एक आदर्श नागरिक,डॉक्टर, इंजिनियर,वकील व राष्ट्रपती,पंतप्रधान,मुख्यमंत्री,मंत्री,आमदार,खासदार बनण्यासाठी नितीमुल्यांची सांगड घालून एक सक्षम नागरिक निर्माण करण्याचे पवित्र काम या समाजात शिक्षक करत असतात.सरकार व शासनाने राज्यातील सर्व शिक्षकांना सतत ऑनलाईन कामकाज देवून २४ तास शिक्षक शासानासाठी व सरकारसाठी उपलब्ध करून दिला आहे त्यामानाने आमदार प्रशांत बंब हे आपल्या मतदार संघात कधीच ऑफलाईन व ऑनलाईन उपलब्ध नसतात त्यामुळे त्यांची आमदारकीच रद्द करण्यात यावी अशी मागणी शिक्षक परिषद मा.विधानसभा व मा.विधान परिषद अध्यक्ष यांच्याकडे करणार आहे,असा टोलाही शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्या वतीने लगवण्यात आला आहे.मा. विधानसभा/विधान परिषद अध्यक्ष यांनी अश्या समाजात शिक्षकांप्रती वाचाळवीर आमदारावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आता राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी केली आहे.
मा. आमदार बंब यांनाही कोणीतरी शाळेत १ ली मध्ये १ चा पाढा शिक्षकांनीच हात धरून शिकवला होता हे ते विसरून गेलेले दिसतंय, असे वाटते जेव्हा मुल प्रथम शाळेत जाते त्यावेळेस पालकांना शिक्षकाप्रती असलेल्या गुरुवर्य भावना व आदर यामुळेच विद्यार्थ्याना शाळेत घातले जाते व माझ्या मुलाकडे लक्ष द्या अश्या भावनेने आर्त स्वरूपात पालकांनी साद घातलेली दिसते.मा. आमदार बंब हे विसरून गेलेले दिसतात की त्यांना घडविणारे एक शिक्षकच व गुरुवर्य होते म्हणून आज ते विधिमंडळात बसू शकले.जर त्यांना शैक्षणिक दृष्ट्या घडवले नसते तर आज ते विधानभवनात बसून आपल्याच गुरुविषयी असे अपशब्द काढले नसते.आज त्यांना शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांनीही वाईट वाटत असेल की मी असा नागरिक का घडवला?सगळ्या गुरूंना आज पश्चातप होत असेल.असे शिक्षक परिषदेच्या वतीने सांगण्यात आले.
देशाच्या इतिहासात व महाराष्ट्रात अगदी प्राचीन काळापासून गुरू शिष्य परंपरा खूप मोठया प्रमाणात पाहायला मिळते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,यांनाही एका शिक्षकांनी,गुरूंनी ज्ञान देवून समाजाला कोहिनूर हिरा दिला. सावित्रीबाई फुले या पहिल्या स्त्री शिक्षिकेने तर सर्व महिलांना शिक्षणाची गोडी लावून,संधी उपलब्ध करून चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर काढून महिलांना आज पुरुषांप्रमाणे सर्व क्षेत्रात समान संधी उपलब्ध करून दिली.आणि अश्या गुरू शिष्याच्या परंपरेला मा. आमदार बंब यांनी असे उद्गार काढून सर्व गुरूंचा अपमान करणारे शब्द काढले त्याबद्दल राज्यातील सर्व शिक्षक व गुरू शिष्य परंपरेच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे असे शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू सर,कार्याध्यक्ष श्री.नागो गाणारसर,सरकार्यवाह श्री.राजकुमार बोंनकिल्ले,कोषाध्यक्ष श्री.राजेंद्र सूर्यवंशी, यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
तसेच राज्यातील शिक्षकांच्या पाठीशी सर्व संघटनांनी खंबीरपणे उभे राहण्यासाठी.सोमवार दिनांक 4/12/2023 ते बुधवार दिनांक 06/12/2023 तीन दिवस तसेच जोपर्यंत मा. आमदार बंब शिक्षकांची माफी मागत नाही तोपर्यंत आपल्या स्टेटसला व प्रोफाइलला आमदार बंब यांचा जाहीर निषेधार्थ बॅनर ठेवून सर्व राज्यातील शिक्षक एकजुटीची आपण सर्वांनी मिळून ताकद दाखवून देवू असेही शिक्षक परिषदेच्या वतीने प्रांतअध्यक्ष श्री.वेणूनाथ कडू, कार्याध्यक्ष श्री.नागो गाणार सर, सरकार्यवाह श्री.राजकुमार बोंनकिल्ले,कोषाध्यक्ष श्री.राजेंद्र सूर्यवंशी, यांच्या वतीने सांगण्यात आले.