मा.श्री.आकाशभाऊ गोसावी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिम्मित श्री संत बाळूमामा प्रतिष्ठानच्या माध्यमातून शालेय साहित्य वाटप

भोसे दि. २९ जुलै (प्रतिनिधी) कर्जत तालुक्यातील चखालेवाडी व वाघनळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांसमवेत मा.श्री.आकाशभाऊ गोसावी यांचा अभिष्टचिंतन सोहळा श्री संत बाळूमामा प्रतिष्ठानच्या वतीने साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी आकाश भाऊंनी मनोगत व्यक्त करताना लहान मुलांमध्ये वाढदिवस साजरा करत असल्याचे समाधान असुन यापुढे असेच सामाजिक कार्य श्री संत बाळूमामा प्रतिष्ठानच्या माध्यमातून करणार असल्याचे सांगितले तसेच युवा नेते राहुल चखाले यांनी यापुढे वाढदिवस फटाके किंवा डिजे न लावता विद्यार्थ्यांमध्ये साजरा करण्याचा मनोदय व्यक्त केला. मुख्याध्यापक संतोष वायकर यांनी मुलांच्या प्रगतीचा वाढता आलेख पालकांसमोर मांडला. व प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य असेच चालू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली यावेळी शिक्षिका रेश्मा ठानगे यांनी प्रास्ताविक केले. तर मुख्याध्यापिका अनिता काळे यांनी आकाश भाऊंच्या सामाजिक कार्याविषयी विध्यार्थ्यांना माहिती देत आभार मानले. यावेळी शिक्षक संपत बिटके, पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक निलेश कोंढरे, दिगंबर ढोले, चखालेवाडीचे ग्रामस्थ गणेश कोळेकर,अमोल बुरंगे, राहुल बुरंगे, संपत खटके, शहाजी बिटके,आशुतोष बुरंगे आणि जेष्ठ नागरीक विठ्ठल चखाले उपस्थित होते.