अहिल्यानगर दि 15 नोव्हेंबर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांच्या प्रचारासाठी नगर शहरातील भिस्तबाग चौकात आज , 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता भव्य विजय निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला खासदार सुप्रियाताई सुळे आणि खासदार निलेश लंके यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, ज्यामध्ये ते आपल्या प्रभावी वक्तृत्वातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
नगर शहरातील महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांचा सहभाग या वेळी असणार आहे, सर्व कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे. या सभेत अभिषेक कळमकर यांच्या नेतृत्वाखाली नगरच्या भविष्याचा दृष्टिकोन मांडण्यात येणार असून, नगर विकास, रोजगार निर्मिती, महिला सुरक्षा, सामाजिक ऐक्य, शहरामध्ये वाढलेली दहशत, हे मुद्दे केंद्रस्थानी असतील.
सभेत सुप्रिया सुळे आणि निलेश लंके हे नागरकरांना आघाडीच्या महत्त्वपूर्ण योजनांचे संक्षिप्त विवेचन करतील. रोजगाराची संधी, उद्योग-व्यवसायाच्या क्षेत्रात वाढ, शहराचा सर्वांगीण विकास, नगरची सुरक्षितता, महिलांचे सक्षमीकरण, तसेच सामाजिक ऐक्य कसे जपता येईल, याबाबतचे मार्गदर्शन ते करतील.
अभिषेक कळमकर यांच्या प्रचारात अजून ऊर्जा भरण्यासाठी शहरातील तरुणाई आणि नागरिकांचा कसा सहभाग मिळवता येईल, महाविकास आघाडीच्या नेतृत्वाने नगरला सक्षम, समृद्ध, आणि प्रगत बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, आणि त्यासाठी या सभेत एकत्र येऊन विजयाचा निर्धार करण्यात येणार आहे.
शहरातील मतदारांना अभिषेक कळमकर यांच्याकडे नगरच्या विकासासाठी एक समर्थ उमेदवार आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा