सामाजिक

संघर्षाच्या परिनीतीतुन यश प्राप्त होते-सोमनाथ जगताप

त्रिभुवनवाडीत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख

करंजी/ संघर्षाच्या परिनीतीतून यश प्राप्त होत असते त्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या विचाराच्या महिला मुली प्रत्येक कुटुंबात निर्माण होण्याची गरज असून त्यासाठी प्रत्येक महिलेने शिक्षणाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महिला बचत गटाच्या उमेद अभियानचे जिल्हा व्यवस्थापक सोमनाथ जगताप यांनी केले आहे. पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी येथे शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक व कौडगाव निंबोडी त्रिभुवनवाडी ग्रूप ग्रामपंचायतीच्या सरपंच मंगल म्हस्के यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कर्तबगार महिलांचा सन्मान सोहळा सोमवारी पार पडला.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक मंगलतई म्हस्के, शिवसेनेच्या उपजिल्हा संघटक मंदाताई कुलकर्णी, शिवसेनेचे पाथर्डी शेवगाव विधानसभा संघटक भगवान दराडे, उमेद अभियानच्या व्यवस्थापिका श्रीमती मंजुषा धिवर, शिवसेनेचे तालुका संघटक राजेंद्र म्हस्के, युवासेनेचे तालुका अध्यक्ष अनिल रांधवणे, शिवसेनेच्या तालुका संघटक सविता ससे, संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्य मिरा बडे, शिवसेना महिला उपतालुका संघटक सौ सविता वारंगुळे, वेणूताई रहाटे, मीनाक्षी शेरकर,सिमा डाळिंबकर, माजी सरपंच रोहिणी लवांडे, अनघा वाघमारे, उपसरपंच अंबादास कारखेले, ग्रामपंचायत सदस्य विकास उदमले, जनार्दन बर्डे, पारूबाई दोडके, गीता कारखेले, सोनाली कारखेले, बचत गटाचे समन्वयक आकाश रामटेके, बाबासाहेब गुंड, सचिन हाडोळे, सुधाकर शेरकर, अविनाश कारखेले, मानव सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील मतकर यांच्यासह तिसगाव गटातील महिला बचत गटातील महिला भगिनी, विविध गावच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा व्यवस्थापक जगताप म्हणाले राज्यात सहा लाख बचत गट असून या बचत गटांच्या माध्यमातून 60 लाख महिलांचे जाळे विणलेले असून ग्रामीण भागात उमेद अभियान यशस्वीपणे राबवले जात आहे. महिलांना या बचत गटाच्या माध्यमातून स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाला व्यावसायिकदृष्ट्या मोठा आधार देण्याचे काम केले जात आहे. जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी म्हणाले आपला देश जरी पुरुष प्रधान म्हणून ओळखला जात असला तरी या देशाला आता महिला प्रधान म्हणून देखील ओळखण्याची गरज आहे प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले कार्य कर्तुत्व सिद्ध केलेले आहे राष्ट्रपती पदापासून पंतप्रधानापर्यंत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देशातील महिला भगिनींनी यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे सरकार असून ग्रामीण भागातील महिलांना दोन म्हशी विकत घेण्यासाठी कर्ज स्वरूपात आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करणार असल्याचे दळवी म्हणाले. यावेळी महिला जिल्हा संघटक मंगल म्हस्के म्हणाल्या ग्रामीण भागातील महीला खूप कष्टाळू आणि प्रामाणिक आहेत बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला कर्ज घेतात आणि त्या कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड देखील करतात अशा महिलांना यापुढे देखील सर्वतोपरी मदत करणार असल्याचे म्हस्के म्हणाल्या. सूत्रसंचालन प्राध्यापक सुनील मतकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार आकाश रामटेके यांनी मांनले. या सन्मान सोहळ्यानिमत्त बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल येथे लावण्यात आले होते. तसेच या ठिकाणी कार्यक्रमानिमित्त आलेल्या महिलांनी रांगोळींच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे