महिला दिनानिमित्त महिलांच्या हस्ते कामाचा शुभारंभ
प्रभाग क्र.11 मधील डावरे गल्ली येथे कॉंक्रिटीकरण व पेविंग ब्लॉक च्या कामाचा शुभारंभ

अहमदनगर दि.८ मार्च(प्रतिनिधी)- प्रभाग क्र.11 परिसरातील डावरे गल्ली येथे कॉंक्रिटीकरण व पेविंग ब्लॉक च्या कामाचा शुभारंभ महिला दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ महिला लतिफा शेख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरसेवक मुजाहिद (भा) कुरेशी, जरीना शेख, रंजना पाचारणे, प्रिया चंदेल, मधु खामकर, मौलाना शाबाज नदवी खान, मुस्ती अल्ताफ अहमदनगरी, फिरोज शेख, वसीम खान, अमित चंदेल, तनवीर खान, रमेश खामकर आदी प्रभागातील नागरिक उपस्थित होते. यावेळी नगरसेवक मुजाहिद (भा) कुरेशी म्हणाले की प्रभाग क्र.11 परिसरातील डावरे गल्ली येथे. कॉंक्रिटीकरण व पेविंग ब्लॉक च्या कामाचा शुभारंभ महिलादिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ महिला व प्रभागातील महिलांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रभागांमध्ये नागरिकांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून सर्व नागरिकांचे प्रश्न आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून अनेक विकासात्मक कामे सोडविण्यात आले असून. प्रभाग 11. हा मॉडेल स्वरूपाचा करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या हस्ते कामाचा शुभारंभ केल्याबद्दल प्रभागातल्या नागरिकांच्या वतीने आभार मानण्यात आले.