पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावर नासीर शहानवाज शेख यांची फेर निवड!

पाथर्डी दि.२० जुलै (प्रतिनिधी)
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब व पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली पाथर्डी तालुका काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष पदावर नासिर शहानवाज शेख यांची नुकतीच फेर निवड करण्यात आली,. नासिर शाहनवाज शेख हे गेल्या सात ते आठ वर्षापासून काँग्रेस पक्षाचे कार्य अत्यंत प्रामाणिकपणे व जबाबदारीने करत असून दोन वर्षांपूर्वी वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे नेतृत्व गुण व संघटन कौशल्य हेरून पाथर्डी तालुका काँग्रेसची धुरा त्यांच्या खांद्यावर टाकली तद नंतर त्यांनी ती जबाबदारी अत्यंत समर्थपणे सांभाळून पाथर्डी तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाला प्रमुख राजकीय पक्ष राष्ट्रवादी व भाजप यांच्या यांच्या बरोबरीचे स्थान निर्माण करून दिले .कोणतीही कोणतीही सत्ता साधने नसताना तालुक्यामध्ये सर्व प्रस्थापितांच अधिपथ्य असताना, साधन सुचिता अभावी काँग्रेस पक्षाचे प्रभावीपणे संघटन तयार करून ,सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन सर्व स्तरावरील घटकास पक्षांमध्ये सामावून घेऊन तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करण्यावर भर दिला. पक्षाने केलेल्या आदेश व सूचनेनुसार सर्वसामान्य आणि गरीब वर्गास न्याय मिळवून देण्यासाठी विविध प्रश्नावर त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे अनेक आंदोलने,करण्यात आली, आणि ती यशस्वी झाली, पक्षाचे सर्व उपक्रम धडाडीने राबवण्यात आले, हे सर्व करताना नासिरशेख यांना अत्यंत चांगले सहकारी लाभले आणि या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांनी पाथर्डी तालुक्यामध्ये तालुका ग्राम काँग्रेस कमिटीच्या 60 गावांमध्ये शाखा स्थापन केल्या, याबाबतीत पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटी ही संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मध्ये अव्वल क्रमांक क्रमांकावर असून वरिष्ठ नेते नेहमी या बाबतीत त्यांचे कौतुक करतात , आणि वेळोवेळी त्यांचा सन्मान ही केला गेला,आणि पाथर्डी तालुका रोल मॉडेल म्हणून राज्यात राबवण्याचा संकल्प काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेला असून, नासिर शेख यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन, सर्वसामान्य वर्ग, युवक वर्ग ,महिला वर्ग, तरुण वर्ग व समाजातील इतर सर्व घटकांना सोबत घेऊन पाथर्डी तालुक्यांमध्ये काँग्रेस पक्ष बळकट व समर्थपणे उभा केला या कामी त्यांच्या सर्व सहकारी आणि पदाधिकाऱ्यांचे त्यांना मोलाचे योगदान मिळाले,, त्यांच्या निवडीचे सर्व सर्वत्र उत्साहाने स्वागत होत असून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब ,नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, आमदार लहुजी कानडे साहेब काँग्रेस जिल्हाध्यक्ष माननीय बाळासाहेब साळुंखे जिल्हा समन्वयक माननीय ज्ञानदेव जी वाफारे ,युवा नेता सन्माननीय सत्यजित दादा तांबे, कांग्रेस नेते सन्माननीय राजेंद्र नागवडे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन भाऊ गुजर आदींनी त्यांचे अभिनंदन केले यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रा.जालिंदर काटे तालुका उपाध्यक्ष आनंद सानप युवक काँग्रेस उपाध्यक्ष महेश दौंड सह तालुक्यातील सर्व पदाधिकारी व जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.