ओबीसींनी एकत्र होऊन लढावे लागेल, संघर्ष करावा लागेल – ना. डॉ. जितेंद्र आव्हाड

ओबीसींनी एकत्र होऊन लढावे लागेल, संघर्ष करावा लागेल – ना. डॉ. जितेंद्र आव्हाड
बीड दि.१६ मे ( प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील खडकत या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या ओबीसी जागर परिषदेत राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा अल्पसंख्यांक मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओद्वारे परिषदेला शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. या परिषदेला संबोधित करताना आव्हाड साहेब म्हणाले की ओबीसींची लोकसंख्या 54 टक्के असतानाही या या ओबीसींना बाजूला ठेवल जात आहे ओबीसींनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान टिकवण्यासाठी सर्वांनी संघटित होणे गरजेचे आहे. ओबीसींना आरक्षण मिळावे यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता जय भीम हा फक्त नारा नसून एक ऊर्जेचा जागर आहे आणि तो केलाच पाहिजे. समतेचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणला होता. ती समता जर कायमची नष्ट होणार असेल तर बोलाव लागेल, लढावे लागेल, संघर्ष करावा लागेल असे आवाहनही या या परिषदेत त्यांनी केले. या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश संघटक मुबीन मुल्ला अष्टेकर उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती मध्ये जिल्हा परिषद गटातील नेते मंडळी तसेच कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जुबेर मुजावर उपस्थित होते या परिषदेचे आयोजन जितेंद्र आव्हाड युवामंच मराठवाडा विभागीय अध्यक्ष तसेच संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य अतुल भाऊ शिंदे यांनी केले येणाऱ्या काळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी जागर परिषदेचे आयोजन करून ना. डाॅ. आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे विराट मोर्चा काढून केंद्र शासनाला जाब विचारण्यात येणार आहे, लढाई करणार आहे असे मत मुबीन मुल्ला अष्टेकर यांनी व्यक्त केले.