प्रत्येकाच्या बहिणी चे संरक्षण करणे भावाचे कर्तव्य -श्रीनिवास बोज्जा सहजयोग परिवार कर्जत च्या वतीने रक्षाबंधन साजरा

कर्जत (प्रतिनिधी)-कर्जत सहजयोग परिवार च्या वतीने रक्षाबंधन निमित्त कालिका मंदिर येथे राक्षबंधनाचा कार्यक्रम चे नियोजन करण्यात आले होते या वेळी बोलतांना अहमदनगर जिल्हा सहजयोग समिती चे जिल्हा अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा म्हणाले हिंदू धर्मातील रक्षाबंधन हा सण महत्वाचं सण असून या दिवशी भावाला बहीण राखी बांधत असते व त्याच्या कडून स्वतःचे संरक्षणाचे वचन मागते व भाऊ आपल्या बहिणीला तिचे आयुष्यभर संरक्षण करेल असे वचन देतो. या साठी प्रत्येकाच्या बहिणी चे संरक्षण करणे भावाचे कर्तव्य असून जर हे कर्तव्य पार पाडले तर या समाजात विधवंसंक घटना घडणार नाही या साठी प्रत्येक पुरुषाने रक्षाबंधन या दिवशी स्त्री संरक्षण करण्याचे वचन घेणे ही काळाची गरज आहे असे श्रीनिवास बोज्जा म्हणाले.
या वेळी अहमदनगर सहजयोग जिल्हा सदस्य डॉ. चंद्रशेखर मुळे यांनी सर्वांचे स्वागत करून प. पु. माताजी श्री निर्मला देवी यांचे प्रतिमेस हार अर्पण करून ध्यान धारण करून घेतली. त्यानंतर कर्जत तालुका सहजयोग समिती प्रमुख बाळासाहेब कानडे यांनी रक्षाबंधन बाबत माहिती देऊन सर्व महिलांना राख्या बांधण्याचे आवाहन केले या वेळी उपस्थित सर्व पुरुषांनी महिलांचे संरक्षण करण्याचे वचन दिले. मेजर कुंडलिक ढाकणे यांनी उपस्थिताचे आभार मानले.
या कार्यक्रमास राजू ढेरे, डॉ.तडे दत्ता पखाले, सौ. कमल कानडे, सौ सूर्यवंशी, सौ. पाठक, सौ. सरोज कानडे, सौ. रुपाली शहाणे, सौ.मीनाताई कुलथे, सौ. यशोदाताई नेवसे,सौ. वीणा बोज्जा सौ. छाया ढाकणे, अभय ठेंगणे, उन्नती द्यावनपैल्ली, पूर्वजा बोज्जा आदी उपस्थित होते.