नाशिक विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी सुधीर लंके

नाशिक, दि. 5 सप्टेंबर,2023 (प्रतिनिधी)
नाशिक विभागीय अधिस्वीकृती समितीची अध्यक्ष निवडीची बैठक विभागीय माहिती कार्यालय,नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दै.लोकमत अहमदनगर आवृत्तीचे निवासी संपादक सुधीर लंके यांची विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
अध्यक्ष निवडीसाठी निवडणुक प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी समितीचे सदस्य किरण लोखंडे यांनी सूचक म्हणून सुधीर लंके यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात यावी असे सुचविले. त्यांच्या सुचनेला सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले. श्री.सुधीर लंके यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवडणूक प्रक्रिया विभागीय माहिती कार्यालय, नाशिकचे उपसंचालक (माहिती) ज्ञानेश्वर इगवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सदस्य विजयसिंह मोहनराव होलम, अभिजित कुलकर्णी, किरण लोखंडे, सहायक संचालक मोहिनी राणे उपस्थित होते.