राजकिय

बालमटाकळी सेवा संस्थेत इतिहास घडविण्यासाठी अपक्ष उमेद्वाराला निवडून द्या: तुषारभाऊ वैद्य

बोधेगाव दि.८(प्रतिनिधी)-
निवडणूक लागून सेवा संस्था आर्थिक खर्चात जाऊ नये, सेवा संस्थेची निवडणूक ही बिनविरोध व्हावी अशी भावना प्रस्थापितांची होती. परंतु उमेदवारांना फार्म भरताना आमिष दाखवले आणि नंतर जातीयवादाच्या पार्श्वभूमीवर त्यांना हटवण्याची जी भूमिका घेतली ती लांछनास्पद असून ही निवडणूक प्रस्थापितांनी अट्टाहासाला पेटून एका जागेसाठी निवडणूक लावली आहे.
त्यामुळे मतदारानी देखील यांचे डाव ओळखून अपक्षाला मतदान करून ईतिहास घडविण्याचा मानस यावेळी बालमटाकळीचे उपसरपंच तुषारभाऊ वैद्य यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले किंवा, केवळ सत्तेसाठी, स्वार्थासाठी हेवे-दावे ठेऊन ही निवडणूक होत आहे. पक्षाशी एकनिष्ठ तसेच निष्ठावाण व्यक्तीला डावलून केवळ स्वतःच्या फायद्यासाठी, पदासाठी राजकारण केले जात आहे. केवळ कुठले तरी आमिष दाखवून, माणसे भुलवून त्यांना दगा फटका बसेल असे राजकारण कधी आम्ही केले नाही. गावात राजकारण आणि समाजकारण करत असताना लोक हिताचे राजकारण आम्ही करतो, केवळ अट्टाहासाला पेटून ही निवडणूक प्रस्थापितांनी लावली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या दोन गटातच ही निवडणूक मोठ्या प्रमाणात लागल्याने आपण आपलेच अपक्ष दोन उमेदवार हे निवडून आणून या निवडणुकीत इतिहास घडवून आणण्याचे आवाहन वैद्य यांनी केले.
शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणूकीच्या प्रचारार्थ अपक्ष उमेदवार अशोक घोरपडे व बाबुलाल शेख या दोन्ही उमेदवाराच्या प्रचारार्थ गावातून रॅली काढून तसेच श्री बालंबिका देवी मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात बालमटाकळी गावचे उपसरपंच तुषारभाऊ वैद्य हे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावचे जेष्ठ नेते सुदामराव शिंदे हे होते.या वेळी भाजपाचे जेष्ठ नेते कासमभाई शेख, वंचितचे नेते कमुभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते अशोक काळे, जेष्ठ नेते अमृत शेठ, ग्रामपंचायत सदस्य मल्हारी घुले, सामाजिक कार्यकर्ते मधुकर पाटेकर, अफसर शेख, एकनाथ अण्णा वैद्य, शोकत मुकादम, सोमनाथ सौन्दर, अनिल डेरे, ग्रा. स. धनंजय देशमुख, जमादारभाई शेख यांच्यासह बाडगव्हाण, सुकळी, मुरमी गावातील ग्रामस्थ तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक, सूत्रसंचालन भारत घोरपडे यांनी केले तर आभार संभाजी घोरपडे यांनी मानले.

*****

प्रस्थापितांनी आदल्या दिवशी आमचे फार्म ठेवले असल्याचे खोटे सांगितले. आणि दुसऱ्या दिवशी सूचकाच्या हातून आमचा फार्म मागे घेतला. एवढी मोठी फसवणूक आमची केली. आशा लोकांना आपली जागा दाखवून देण्यासाठी शिवाजी महाराजांची ढाल आणि तलवार पुढे करून छत्री डोक्यावर धरून दोन अपक्ष उमेदवारांसह निवडणूकीला सामोरे जाणार आहोत.

(कासमभाई शेख-अध्यक्ष, तंटामुक्ती समिती, बालमटाकळी)

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे