साईकृपा माध्यमिक विद्यालयात श्री संत बाळूमामा प्रतिष्ठानच्या वतीने पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

श्रीगोंदा(टाकळी लोणार): श्री संत बाळूमामा प्रतिष्ठानच्या वतीने टाकळी लोणार गावातील साईकृपा माध्यमिक विद्यालयात बक्षीस वितरण सोहळा दि.15 ऑगस्ट मंगळवार रोजी पार पडला. श्री संत बाळूमामा प्रतिष्ठान भोसे-चखालेवाडी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या निंबध स्पर्धमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या महोत्सवादिनी प्रमाणपत्र, ट्रॉफी आदींनी गौरविण्यात आले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण छोटा पुढारी म्हणुन संपुर्ण महाराष्ट्रभर ज्यांचा नावलौकिक आहे असे *घनश्याम दरवडे* आणि गावातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच स्पर्धेचे आयोजन प्रतिष्ठानच्यावतीने दिगंबर ढोले, सुमित साळुंके,सोमनाथ बोडखे,कृष्णा गोफणे, चक्रधर केसकर,मयुर करांडे,किरण पडळकर यांनी केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शिक्षण समिती अध्यक्ष पांडुरंग खराडे, प्रगतशील शेतकरी बाळासाहेब मते,मेजर भाऊसाहेब काळे, मेजर वैभव भांडवलकर, मेजर घनश्याम गोडसे,रामहारी रोडे, डीगंबर फंड तसेच मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,ग्रामस्थ तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक मुबारक शेख यांनी केले.