कौतुकास्पद

मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश उपक्रम जामखेड तालुक्यात उत्साहात साजरा – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे

जामखेड दि. १३ ऑगस्ट (प्रतिनिधी) :- मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश हा कार्यक्रम १२ ऑगस्ट २० २३ रोजी सकाळी ९ वाजता जामखेड तालुक्यातील सर्व शाळा मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी दिली .
माती असलेला कलश व मशालसह प्रभात फेरी काढण्यात आली , यावेळी विद्यार्थी यांनी विविध घोषणा दिल्या .शिला फलक उभारण्यात आला ,पंचप्राण ची शपथ घेण्यात आली , वीरांना वंदन करण्यात आले , वसूधा नमन करण्यात आले . शाळेतील विद्यार्थी वेगवेगळ्या सुंदर गणवेशामध्ये फेरीत सहभागी झाले .
कार्यक्रमामध्ये विद्यार्थी , शाळा व्यवस्थापन समिती , पालक, ग्रामस्थ , पदाधिकारी , शिक्षक अदि. मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे