गुन्हेगारी

एमआयडीसी परिसरात कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अहमदनगर दि.९ ऑगस्ट (प्रतिनिधी) एमआयडीसी परिसरात कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणात्या सराईत आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
दिनांक २९/०५/२०२३ रोजी फिर्यादी नितीन सुधाकर गायकवाड वय ३४ वर्ष धंदा- पान स्टॉल चेतना कॉलनी नवनागापुर यांनी फिर्याद दिली की, दिनांक २९/०५/२०२३ रोजी २१/३० वा चे सुमारास साई पान स्टॉल चेतना कॉलनी अहमदनगर मनमाड रोडवर पान विक्री करत असतांना दोन आरोपी यांनी हातात कोयता व गुप्ती घेवुन त्याचा धाक दाखवुन फिर्यादीचे पान स्टॉल गल्यातील दोन हजार रुपये बळजबरीने काढुन चोरुन नेले आहे. वैगेरे मचकुराचे फिर्यादीवरून एमआयडीसी पोस्टे गुन्हा रजि नंबर ४७८ / २०२३ भादवि ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी १) शुभम उर्फ छब्या रविंद्र गायकवाड वय २० वर्ष रा फोर्जिंग कॉलनी वडगाव गुप्ता शिवार ता. जि. अहमदनगर २) विश्वास गायकवाड रा. एमआयडीसी अहमदनगर यांनी केला आहे. त्यानुसार सपोनि राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी नामे विश्वास नामदेव गायकवाड वय २३ वर्ष रा. श्री स्टाईल चौक एमआयडीसी अहमदनगर यांना शिताफीने पकडले. त्याचेकडे विचारपुस केली
असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. आरोपी नामे विश्वास नामदेव गायकवाड वय २३ वर्ष रा. श्री स्टाईल चौक एमआयडीसी
अहमदनगर याचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. १) एमआयडीसी पोलीस स्टेशन गु रजि नंबर १२ / २०२१ भादवि कलम ३९५ प्रमाणे.

२) एमआयडीसी पोस्टे गु रजि नंबर १४८ / २०२३ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे.

३) तोफखाना पोस्टे गु रजि नंबर२० / २०२१ भादवि कलम ३९२, ४२७,३४ प्रमाणे. ४) नगर तालुका पोस्टे गु रजि नंबर २८०/ २०२१ भादवि कलम ३९५, ३९७, ४२७ प्रमाणे. ५) एमआयडीसी पोस्टे गुन्हा रजि. नंबर ४७८/ २०२३ भादवि ३९२, ३४ प्रमाणे.
सदरची कारवाई मा. श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब अपर पोलीस अधीक्षक सो. अहमदनगर, श्री. संपत भोसले साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी सो नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोसई योगेश चाहेर पोसई पोना/संदीप चव्हाण पोना/ राजु सुद्रीक, पोना नेहुल, पोना विशाला थोरात, पोना भागवत, पोकों सचिन हरदास, पोकों किशोर जाधव, पोकॉ/ उमेश शेरकर यांचे पथकाने केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे