सामाजिक उपक्रम करूनच वाढदिवस साजरा केला पाहिजे:सुरेश जाधव

अहमदनगर दि.६ (प्रतिनिधी) दि अहमदनगर फटाका व्यापारी असो चे जेष्ठ सदस्य देविदास ढवळे यांचे वाढदिवसानिमित्त असोसिएशन च्या वतीने शुभेच्छा देते प्रसंगी असो. चे अध्यक्ष सुरेश जाधव सचिव श्रीनिवास बोज्जा, उपाध्यक्ष गणेश परभणे, शिवराम भगत अरविंद साठे, सुनील गांधी, मयूर भापकर, भैय्या बर्फवाले व उबेद खान आदी उपस्थित होते.
या प्रसंगी अध्यक्ष सुरेश जाधव म्हणाले सधाच्या काळामध्ये वाढदिवस केक कापून डीजे लावून व मोठे होर्डिंग लावून साजरा करतात, परंतु याचा कोणताही उपयोग समाजासाठी होत नाही. सदरचा खर्च हा निष्फळ ठरतो. यासाठी वाढदिवस साजरा करत असतांना गोर गरिबांना मदत होईल असे उपक्रम राबविल्यास फार मोठं समाज कार्य आपल्या हातून घडेल यासाठी प्रत्येकाने आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवूनच साजरा करायला पाहिजे असे जाधव म्हणाले.
या वेळी असोसिएशन चे मा. अध्यक्ष व विद्यमान सचिव व जेष्ठ सदस्य सुनील गांधी यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिलेत.
शेवटी आभार देविदास ढवळे यांनी मानले.