कोपरगाव सैनिकी मुलांच्या वसतिगृहात प्रवेशाचे आवाहन २८ जूलै अर्ज करण्याची अंतिम मुदत

शिर्डी, दि. ८ जूलै (प्रतिनिधी) – कोपरगांव येथील सैनिक मुलांच्या वसतिगृहात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासाठी २८ जूलै २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
इयत्ता अकरावी ते पदव्युत्तर शिक्षण तसेच औद्योगिक प्रशिक्षण आणि तांत्रिक विद्यालयामध्ये शिकत असणाऱ्या युध्द विधवा पाल्य, माजी सैनिक विधवा पाल्य, माजी सैनिक व युद्धात जखमी झालेले माजी सैनिकांचे पाल्य तसेच सेवारत सैनिक पाल्य यांना या वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार आहे. प्रदर्शन रोडवरील खंडोबा मंदिराचे मागे कोपरगाव सैनिकी मुलांचे वसतिगृह कार्यरत आहे.
प्रवेश प्रक्रिया अर्ज २८ जूलै २०२३ पर्यंत सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील. ज्या पालकांनी अर्ज जमा केलेले आहेत. अशा पालकांनी व त्यांच्या पाल्याने ३१ जुलै २०२३ रोजी प्रवेश प्रक्रीयेसाठी स्वत: हजर राहणे आवश्यक आहे. युध्द विधवा व इतर माजी सैनिक विधवांचे सर्व पाल्यांना तसेच माजी सैनिक अनाथ पाल्यांना भोजन, निवास व सेवा शुल्क मोफत आहे.
प्रवेशअर्ज व अधिक माहितीसाठी वसतिगृह अधिक्षक 02423/
227290 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन वसतिगृह अधीक्षक धन्यकुमार सरोदे यांनी केले आहे.