स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आज मुळा धरणामध्ये जलसमाधी आंदोलन

राहुरी दि.२१ डिसेंबर (प्रतिनिधी)
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटांनी मुळा धरणावर जलसमाधी आंदोलन केले. आंदोलन दरम्यान काही कार्यकर्त्यांनी मुळा धरणाच्या पाण्यात उड्या फेकल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली माञ पोलिसांनी देखील पाण्यामध्ये उड्या घेऊन आंदोलकांना बाहेर काढल्याने यावेळी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी प्रसंगावधान राखत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व शिवसेनेचे जिल्हाधध रावसाहेब खेवरे याना पाण्यात उतारण्यापासून रोखल्याने मोठा अनर्थ टळला.
अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 40 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करा असा शासनाला 7 दिवसाचा अल्टिमेट दिला होता मात्र अद्याप कोणती नुकसान भरपाई मिळाली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात आले होते. आंदोलक मुळा धरणावर पोहोचत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी मुळा धरणांमध्ये उड्या घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला मात्र धरण परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने धरणात उड्या घेतलेल्या आंदोलकांना पोलिसांनी पाण्यात जाऊन बाहेर काढलं अन् तात्काळ रावसाहेब खेवरे,रविंद्र मोरे यांच्या सह भागवत मुंगसे , प्रशांत शिदे ,सुनिल शेलार,विजय शिरसाठ,कैलास शेळके, हमीदभाई पटेल,विठ्ठल सूर्यंवशी,राहूल चोथे,सुभाष चोथे,विशाल तारडे, मिननाथ पाचरणे या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.. , घटनास्थळी प्रांताधिकारी अनिल पवार,तहसीलदार एफ. आर. शेख, पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांनी योग्य ती खबरदारी घेतल्याने मोठा अनर्थ टळला.