गुन्हेगारी

मोक्का व दरोड्याच्या गुन्ह्यातील मागिल 5 वर्षापासुन फरार असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन गजाआड!

अहमदनगर दि. ९ जुलै (प्रतिनिधी) मोक्का व दरोड्याच्या गुन्ह्यातील मागिल 5 वर्षापासुन फरार असलेला आरोपीला गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 11/02/19 रोजी फिर्यादी श्री. दत्तात्रय बंडु ननवरे वय 48, रा. दौंड, जिल्हा पुणे हे मारुती कारमधुन कुटूंबियासह जाताना मातोश्री हॉस्पीटल काष्टी ते दौंड जाणारे रोड, ता. श्रीगोंदा येथे लघुशंकेसाठी थांबलेले असताना अनोळखी 5-6 इसमांनी चाकुचा धाक दाखवुन 3,48,100/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन, घड्याळ व मारुती कार दरोडा चोरी करुन चोरुन नेले होते. सदर घटने बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.र.नं. 154/2019 भादविक 395 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे तपासात पाच आरोपी निष्पन्न करुन दोन आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले होते व इतर तीन आरोपी अद्याप पावेतो फरार होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. दिनेश आहेर, यांना गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/अतुल लोटके, पोना/रविंद्र कर्डीले, विजय ठोंबरे, पोकॉ/रोहित मिसाळ, आकाश काळे, बाळु खेडकर व भाऊसाहेब काळे यांना जिल्हयातील गंभीर गुन्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींना ताब्यात घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथक कर्जत परिसरात फरार आरोपींचा शोध घेताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वर नमुद गुन्ह्यातील फरार आरोपी मिथुन काळे, रा. आखोणी, ता. कर्जत हा त्याचे राहते घरी आला आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने पोनि/आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन आरोपीचे ठिकाणा बाबत माहिती घेवुन बातमीतील वर्णना प्रमाणे एका संशयीतास ताब्यात घेतले. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) मिथुन बंड्या काळे, वय 30, रा. आखोणी, ता. कर्जत असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्या बाबत विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेतले.
आरोपी मिथुन बंड्या काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर, सेलापुर व पुणे जिल्ह्यातील गंभीर स्वरुपाचे एकुण -10 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. कलम
1. दौड, जिल्हा पुणे गु.र.नं. 205/17 भादविक 395, 397 सह मोक्का
2. श्रीगोंदा 129/22 भादविक 457, 380, 511
3. दौंड, जिल्हा पुणे 165/17 भादविक 395
4. श्रीगोंदा 154/20 भादविक 395
5. श्रीगोंदा 54/22 भादविक 457, 380
6. कर्जत 201/10 भादविक 395
7. कर्जत 245/14 भादविक 392, 376 (ड), 34
8. कर्जत 138/14 भादविक 302, 143, 147, 148
9. करमाळा, जिल्हा सोलापुर गु.र.नं.392/2023 भादविक 392, 341, 504, 34
10. करमाळा, जिल्हा सोलापुर गु.र.नं.395/2023 भादविक 380, 34
ताब्यातील आरोपी मिथुन बंड्या काळे यास श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास श्रीगोंदा पोस्टे करीत आहे.
सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री. विवेकानंद वाखारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे