भाजपा पक्ष श्रेष्ठीची विधान परिषदे पाठोपाठ माजीमंत्री राम शिंदेवर आणखी मोठी जबाबदारी

कर्जत दि.१६ जून (प्रतिनिधी) :
माजीमंत्री राम शिंदेवर भाजपाच्या पक्ष श्रेष्ठीनी आणखी एक मोठी जबाबदारी देत त्यांची नियुक्ती बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी केली आहे. गुरुवारी संध्याकाळी भाजपाचे विरोधीपक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदे यांची नियुक्ती केली असल्याचे मुंबई येथे जाहीर केले. यावेळी राम शिंदे यांच्यासह भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजीमंत्री आ गिरीश महाजन उपस्थित होते. नुकतेच भाजपाकडून राम शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी देत त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले असून कर्जत-जामखेड मतदारसंघाचे विद्यमान आ रोहित पवार यांना शह देण्यात आला होता. त्या पाठोपाठ राम शिंदेंना बारामती लोकसभा क्षेत्रासाठी प्रभारीपदी नियुक्ती दिल्याने कर्जत-जामखेड मतदारसंघात या नियुक्तीचे भाजपाकडून स्वागत करण्यात आले.