महिलेला शिवीगाळ मारहाण प्रकरणी कुख्यात गुंड रोहिदास मोरेवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल;महिलेवर हल्ला करणारा कुख्यात गुंड रोहिदास मोरेच्या मुसक्या आवळा पिडितेच्या घरच्यांची मागणी

पाथर्डी प्रतिनिधी (दि.२८ मार्च):-पाथर्डी तालुक्यातील वैजू बाबुळगाव येथे शेतीच्या वादावरून एका महिलेचा विनयभंग करून शिवीगाळ व मारहाण केल्या प्रकरणी आरोपी विरोधात पाथर्डी पोलिसांनी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.ही घटना २४ मार्च २०२३ रोजी घडली असून दिलेल्या फिर्यादीत पीडित महिलेने म्हटले आहे की तुम्हाला वाट्याने कसण्यासाठी दिलेली जमीन माझ्या पतीला फसवून तुमच्या नावे का करून घेतली.आमच्या वाट्याचे धान्य सुद्धा दिले नाही.आता,धान्य आम्हाला देऊन टाका व जमीन परत आमच्या नावावर करून द्या,अशी मागणी केली.यावर आरोपी रोहिदास मोरेने पीडित महिलेला शिवीगाळ व मारहाण करून विनयभंग केला.पाथर्डी पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 354,323,504,506,व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.