भोसे गावात श्री संत बाळूमामा मंदिर परिसराची व डिजिटल बोर्डची तोडफोड, प्रतिमेची विटंबना, गुन्हा दाखल!

भोसे दि.८ जून (प्रतिनिधी) कर्जत तालुक्यातील भोसे येथे दि.19 फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी आणि ३१ मार्च २०२३ रोजी श्री रोकडेश्वर ग्रामदेवतेच्या यात्रा उत्सवा दरम्यान दुपारी 1.30 ते सकाळी ६ च्या दरम्यान राजकीय सूड बुद्धीने हुकूमशाही पद्धतीने जाणीवपूर्वक जातीय दंगल घडवुन आणण्याच्या हेतूने आरोपींनी संगनमत करून बाळूमामा मंदिर परिसरातील कंपाऊंड, डिजिटल बोर्डची तोडफोड करून शिवीगाळ दादागिरी केली गेली तसेच मंदिासमोरील बाळू मामांचे फोटो असलेली पाटी फोडून विटंबना केली. तसेच १५ ते वीस गावगुंडांकडून वेळोवेळी जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत. याप्रकरणी सरपंच पती १.अमोल रोहिदास खराडे , ट्रॅक्टर ड्रायव्हर २.काकासाहेब नाना क्षिरसागर, पीर फाट्यावरील हॉटेल व्यावसायिक ३.अतुल बाळासाहेब खराडे आणि ४. शुभम वाल्मीक थोरात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास पो.हे.को श्री.सुनील माळशिकारे करत आहेत.