गुन्हेगारी
कोतवाली पोलिसांची दणकेबाज कामगिरी केडगाव येथील १२ जुगारी केले अटक! तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

अहमदनगर (प्रतिनिधी ४ नोव्हेंबर) नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाणे नेहमीच चर्चेत राहिलेले आहे.शहरातील कोतवाली पोलिसांनी दणकेबाज कामगिरी करत केडगाव येथील १२ जुगाऱ्याना गजाआड करत तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.या वृत्ताची सविस्तर माहिती अशी की,
केडगाव शिवाजीनगर येथे एका फ्लॅटमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली या गोपनीय माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत एकूण बारा आरोपींना अटक करण्यात आली. विनोद तुकाराम मगर यांच्या फ्लॅटमध्ये हा जुगार सुरू होता.कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र जुगार कायदा कलमानुसार बारा जणांवर कारवाई करण्यात आली असे एकूण बारा आरोपींवर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल संदीप थोरात यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.