महिलांनी स्वकर्तृत्वातून समाजात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे – किरण काळे
काँग्रेस पक्षाच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा

अहमदनगर दि.११ मार्च (प्रतिनिधी ): जग बदलते आहे. एकविसाव्या शतकात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत यशस्वीरित्या विविध क्षेत्रांमध्ये पुढे आल्या आहेत. समाजामध्ये खर्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित झालेली पाहायला मिळत आहे. महिलांनी स्वकर्तृत्वातून समाजात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे, असे गौरवोद्गार शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काढले आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
काँग्रेस पक्षाच्या वतीने महिला काँग्रेसच्या पुढाकारातून जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा गुरुवारी काँग्रेस कार्यालयात पार पडला. त्यावेळी काळे बोलत होते. यावेळी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, राणीताई पंडित, स्नेहलताई काळे, अमृता हरिभाऊ कानवडे, कांचंनताई बिडवे, डॉ. निलोफर धानोरकर, डॉ. सुप्रिया महेश वीर, ॲड.चैताली गाडेकर, ॲड. सोनूजा सोनार, उषाकिरण चव्हाण, माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, प्रा.डॉ.बापू चंदनशिवे, खलील सय्यद, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते पाटील, प्रशांत जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, स्रीया या केवळ चूल आणि मूल यासाठी आहेत हा समज दूर होत स्त्रियांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी आता बदलली आहे. स्री शिक्षणाच्या माध्यमातून समाजामध्ये मोठे परिवर्तन झाले आहे. आज व्यवसाय, नोकरी, डॉक्टर, इंजिनियर, पायलट, वकील, मीडिया, उद्योग अशा विविध क्षेत्रांमध्ये महिला काम करत असून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
उषाताई भगत म्हणाल्या की, सामान्य कुटुंबातील महिलांना हिम्मत देण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले आहे. किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील महिलांना येणाऱ्या काळात अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. स्नेहलताई काळे म्हणाले की, आजची महिला ही अबला राहिली नसून ती सबला झाली आहे. तिच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. राणीताई पंडित म्हणाल्या की, महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहत स्वावलंबी झाले पाहिजे.
कांचनताई बिडवे म्हणाल्या की, स्रीयांनी धीटपणे समाजासमोर व्यक्त व्हायला शिकले पाहिजे. समाजाचे दडपण न बाळगता स्रीने स्वतःचे प्रश्न मांडले पाहिजेत. डॉ.निलोफर धानोरकर, डॉ.सुप्रिया वीर यांनी या वेळी महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना स्त्रियांकडून स्वतःच्याच आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे भविष्यात अनेक व्याधींचा सामना त्यांना करावा लागतो. त्यामुळे स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रमिलाताई वाघ यांनी केले. सूत्रसंचालन अमृता कानवडे यांनी केले. वीणाताई बंग, प्रा.डॉ.बापू चंदनशिवे, खलील सय्यद आदींनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी समरीन शेख, हसीना शेख, निकिता मुळे, निर्मला कोरडे, संध्या वाघमारे, रेश्मा शेख, पूनम वंनंम, वृषाली गावडे, अनिता दासरी, प्रियांका भागानगरे, विजया गायकवाड, ज्योती जाजू, छबुबाई भुजबळ, पूजा मेने, वर्षा भगत, वैशाली खरात, वर्षा जगताप, मंगल खरात, चैताली साखला, अर्चना पाटोळे, निलोफर शेख, सौदिया सय्यद, शृतिका नवगिरे, शारदा कर्डिले, मोमीन मिनाज, वैजयंती लांभाते, मंगल पडवळ, अनिता खरात, प्रज्योती गाडे, वैष्णवी बिडवे, डॉ.सुवर्णमाला राऊत, रोहिणी दंडवते, समरीन सय्यद, सुनिता प्रथमशेट्टी, मीना रणशुर, आसावरी वायकर, रेवती दासरी, पुष्पा वायकर, धनश्री दासरी आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.