अनिल करांडे सरपंच झाल्याने दरेवाडीचा पाणी प्रश्न मिटेल!:महेश भोसले

दरेवाडी (प्रतिनिधी) दरेवाडी च्या नागरिकांचा पाण्याचा प्रश्न अनिल करांडे सरपंचपदी विराजमान झाल्याने मिटेल असा आशावाद देशस्तंभ न्यूज नेटवर्क संस्थापक संपादक महेश भोसले यांनी व्यक्त केला.
दरेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त झाल्याने त्या जागेवर उपसरपंच अनिल करांडे यांना सरपंचपदाची संधी मिळाली.त्यांचा नुकताच देशस्तंभ न्यूज परिवार व नागरिकांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी उपसंपादक सुरेश भिंगारदिवे,पीपल्स रिपब्लिकन पार्टी महिला जिल्हा अधक्षा तथा दक्षता कमिटी सदस्या गौतमी भिंगारदिवे,सामजिक कार्यकर्ते संजय ताकवाले, ग्रामविकास अधिकारी संपत दातीर गुलाब जगताप, सौ नंदा जगताप, देशस्तंभ चे दरेवाडी प्रतिनिधी बिट्टू वर्मा,सौ. ज्योती वर्मा , सौ लिलाबाई लूंगसे, सौ आकांक्षा भिंगारदिवे , सौ वर्षो भिंगारदिवे , सरूबाई साळवे , मीराबाई नन्नवरे, प्रमिला मिसाळ आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतमी भिंगारदिवे यांनी केले.यावेळी नूतन सरपंच करांडे यांनी गावचा पाणी प्रश्नच नाही तर विकास कामासाठी नेहमीच प्रयत्नशील असणार असल्याची भावना सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.