ब्रेकिंग
माळीवाडा भागात चालतोय बिंगो अन् राजरोसपणे मटका!

अहमदनगर दि.१२ एप्रिल (प्रतिनिधी) शहरातील गजबजलेल्या ठिकाणी अर्थातच कोतवाली पोलिस ठण्याच्या हद्दीत माळीवाडा भागात बिनदिक्कत पणे बिंगो अन् ऑनलाईन मटका राजरोसपणे सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
माळीवाडा भागातील निसर्ग हॉटेल समोरच असलेल्या महात्मा फुले विद्यार्थी वस्तीगृहाच्या बाजूलाच हा सर्व प्रकार सुरू आहे.कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत हे धंदे सुरू आहेत. मग पोलीस यावर कोणतीच कारवाई करताना का दिसत नाहीत? अशा चर्चा या भागातील
नागरिकांमधून व्यक्त होणे साहजिकच आहे.
यावर कोतवाली पोलीस स्टेशन काय कारवाई करते.याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
असो यावर पोलीस कारवाई करतील की नाही.अशा चर्चा नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.