अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले दोन सराईत गुन्हेगार संगमनेर व घारगांव येथुन जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!

अहमदनगर दि. १० एप्रिल (प्रतिनिधी)
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना आगामी सण व उत्सव अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना चेक करुन सदरचे हद्दपार गुन्हेगार हद्दपार आदेशाचा भंग करुन अहमदनगर जिल्ह्यामध्ये बेकायदेशिररित्या वास्तव्य करताना मिळून आल्यास कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशाप्रमाणे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/दत्तात्रय हिंगडे, पोना/शंकर चौधरी, संतोष लोढे, संदीप चव्हाण, पोकॉ/रणजीत जाधव व चापोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर अशा अंमलदारांचे पथक नेमून हद्दपार इसमांना चेक करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
त्याप्रमाणे पथकातील अंमलदार हे संगमनेर व घारगांव मधील हद्दपार गुन्हेगारांना चेक करीत असताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली कि, हद्दपार इसम नामे 1) रावसाहेब थोरात व 2) आण्णासाहेब वाडगे हे हद्दपार असताना लपूनछपून संगमनेर व घारगांव येथे त्यांचे राहते घरी वास्तव्य करीत आहेत. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील अंमलदार यांनी नमुद हद्दपार इसमांचा शोध घेतला असता हद्दपार इसम नामे 1) रावसाहेब किसन थोरात वय 37, रा. कवठे कमळेश्वर, ता. संगमनेर व 2) आण्णासाहेब सुर्यभान वाडगे, वय 41, रा. येठेवाडी, खंदरमळा, ता. संगमनेर हे संगमनेर व घारगांव येथे त्यांचे राहते घरी मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले. नमुद हद्दपार गुन्हेगारांचे हद्दपार आदेशाबाबत खात्री केली असता, हद्दपार प्राधिकर तथा, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांचेकडील आदेशान्वये अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहेत.
वरील नमुद हद्दपार इसम हे हद्दपार आदेशाचा भंग करुन बेकायदेशिररित्या संगमनेर भागामध्ये वास्तव्य करीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरुध्द संगमनेर तालुका व घारगांव पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पुढील कार्यवाही संगमनेर तालुका व घारगांव पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, मा. श्री. संजय सातवे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.